Home /News /lifestyle /

तुम्हीही सरसकट Antibiotics घेताय सावधान! दुर्मिळ आणि गंभीर संसर्गाला निमंत्रण देताय

तुम्हीही सरसकट Antibiotics घेताय सावधान! दुर्मिळ आणि गंभीर संसर्गाला निमंत्रण देताय

ज्या व्यक्ती या संसर्गबाधित व्यक्तीच्या संपर्कात येतात त्यांनाही या संसर्गाची लागण होते.

    पुणे, 13 ऑक्टोबर : सध्या सर्वत्र कोरोनाव्हायरसने थैमान घातला आहे. अशा परिस्थितीत थोडं जरी आजारी वाटलं तरी आपण डॉक्टरांना न विचारताही औषधं घेतो आणि अशीच औषधं घेणं महागात पडू शकतं. एका 65 वर्षीय  व्यक्तीच्या बाबतीत असंच घडलं आहे. त्याने सरसकट अँटिबायोटिक्स (Antibiotics) घेतली आणि त्यामुळे त्या व्यक्तीला मल्टी ड्रग रेसिस्टंट बॅक्टेरिया (अनेक औषधांना दाद न घेणारा विषाणू) संसर्ग झाला. हा संसर्ग त्या व्यक्तीच्या जीवावर बेतला असता. शिवाय तो पसरलाही असता. मिरजमध्ये राहणारे 65 वर्षांचे मेहबूब जमादार. यांना नीट चालता येत नव्हतं, श्वास घेताना त्रास होत होता. डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी तपासणी केली असता त्यांना Methicillin-Resistant Staphylococcus Aureus (MRSA) संसर्ग असल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सरसकट अँटिबायोटिक्सचं सेवन किंवा हा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या संसर्गाची लागण होते, असं डॉक्टरांनी सांगितलं. पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकच्या क्रिटीकल केअर मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे यांनी सांगितलं, "रुग्ण रुग्णालयात आला त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर होती. चालणं अशक्य होतं, त्याचे अवयव कार्यरत नव्हते, त्याला योग्यपद्धतीने श्वास घेता येत नव्हता, त्याचं हिमोग्लोबिन 3 इतकं कमी झालं होतं. शिवाय त्याचा रक्तदाब कमी होता आणि त्याच्या रक्त सेप्टिक होतं. सेप्टीमिया ज्याला ब्लड पॉयसनिंग म्हणून पण ओळखलं जातं. ज्यावेळी शरीरात बॅक्टेरियाचा संसर्ग असतो त्यावेळी सेप्टीमिया होतो" हे वाचा - तुमची नखंही तुटतात का? नखांना मजबूत बनवण्याच्या सोप्या टीप्स "आम्हाला हा संसर्ग कोणत्या विषाणूंपासून सुरू झाला हे शोधायचं होतं. त्यासाठी केलेल्या तपासणीने आम्हा सर्वांना आश्चर्यचकीत केले. कारण हा एक विषाणू होता MRSA ज्यामुळे हा दुर्मिळ संसर्ग झाला. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात MRSA ची प्रकरणं फारच कमी आहेत. या प्रकरणातून असं दिसून आलं की MRSAचा संसर्ग समुदायातून येऊ लागला आहे. याचं कारण म्हणजे अँटीबायोटिक्सचा सरसकट वापर", असं डॉ. साठे यांनी सांगितलं. या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केले. हा संसर्ग काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्याच्या पाठीत पू जमा झाला होता तो काढून टाकला. MRSA संसर्गाचे विषाणू नाकामध्ये देखील होते त्यामुळे त्यासाठीही रुग्णाला उपचार देण्यात आले. आता रुग्ण संसर्गापासून मुक्त आहे. हे वाचा - पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका पण महिलांनी घेतला धसका; काय आहे कारण वाचा "अँटीबायोटिक्सच्या सरसकट वापरामुळे माझं आयुष्य धोक्यात आलं होतं. मी जगेन की नाही याची खात्रीही मला नव्हती. पण आता मी बरा झालो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही अँटिबायोटिक्स घेऊ नये", असं आवाहन रुग्ण मेहबूब जमादार यांनी केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, पुणे

    पुढील बातम्या