डायबेटिस नियंत्रणात राखण्यासाठी करा ही पाच योगासनं!

डायबेटिस नियंत्रणात राखण्यासाठी करा ही पाच योगासनं!

शारीरिक मेहनत न करणं, बदलती जीवनशैली आणि खाण्या पिण्याच्या वेळा न पाळणं अशा अनेक कारणांमुळे मधुमेह हा आजार होऊ शकतो.

  • Share this:

10 ऑगस्ट : भारतात मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मधुमेहात शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. शारीरिक मेहनत न करणं, बदलती जीवनशैली आणि खाण्या पिण्याच्या वेळा न पाळणं... अशा अनेक कारणांमुळे मधुमेह हा आजार होऊ शकतो. मधुमेह हा आजार पूर्णपणे कधी जात नाही. मात्र खाण्यावर नियंत्रण आणि गोळ्यांच्या मदतीने यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. याशिवाय योगच्या माध्यमातूनही मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

धनुरासन- या योगप्रकारात शरीराला धनुष्याप्रमाणे मोडायचं असतं. या आसनाला मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान म्हटलं जातं. यामुळे ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर हे आसन तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे.

चिमोत्तानासन- या योगसाधनेत दोन्ही पायात अंतर ठेवून समोरच्या बाजूला झुकायचे असते. यामुळे पोटावर ताण तयार होतो. ज्यामुळए शरीराची पाचनक्रिया चांगली होते आणि मेंदू शांत होतो.

अर्ध्य मत्स्येंद्रासन- या योगासनावेळी मणक्याचे हाड फिरते, ज्यामुळे पोटाचाही चांगला व्यायाम होतो. या योगासनावेळी फुफ्फुसांनाही भरपूर ऑक्सीजन मिळतो. फक्त मणक्याच्या हाडालाच नाही तर संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह ठीक होतो.

कपालभाती- हे योगासन केल्याने आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूचे तंतू पुनरुज्जीवित होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फार फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह ठीक होतो आणि शरीरातील इन्सूलिन तयार होण्याची प्रक्रिया ठीक होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.

सुप्त मत्स्येंद्रासन- या योगासनामुळे शरीराचे अवयव सक्रिय होतात. या योगासनावेळी तुमच्या पोटाच्या भागावर ताण येतो. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते आणि याचा मधुमेहाच्या रोगांना फायदा होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

…म्हणून मुलांची लग्नासाठी पहिली पसंत असते वर्किंग वुमन

कॅन्सर होण्याआधी शरीर देतं हे पाच संकेत, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं का?

या उपायांनी तुम्ही एक्सला तुमच्या आयुष्यात परत आणू शकता!

माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 06:51 AM IST

ताज्या बातम्या