Home /News /lifestyle /

Best tourist spots for seniors: Retirement नंतरही आरामात फिरू शकाल अशी आहेत ही ठिकाणं

Best tourist spots for seniors: Retirement नंतरही आरामात फिरू शकाल अशी आहेत ही ठिकाणं

कल्पना करा की तुम्ही एखाद्या शांत प्रवासासाठी निघाला आहेत. प्रवासात स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहात (Quiet And Peaceful Places To Travel), तुम्हाला आवडते ती प्रत्येक गोष्ट करत आहात आणि वेगवेगळ्या पर्यटनस्थळांचा आनंद घेत आहात आणि तेही सुरक्षित वातावरणात.... कुठे मिळेल हे सुख?

पुढे वाचा ...
  मुंबई, 15 जून : आयुष्यभर कठोर परिश्रम केल्यानंतर कामातून निवृत्त होणं म्हणजे त्यानंतर निवांत अराम करणं आणि ताजेतवाने सहलीची योजना आखून जग पाहणं. तुम्ही वयाच्या साठीत असाल तर कल्पना करा की तुम्ही एखाद्या शांत प्रवासासाठी निघाला आहेत. प्रवासात स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहात, तुम्हाला आवडते ती प्रत्येक गोष्ट करत आहात आणि वेगवेगळ्या पर्यटनस्थळांचा आनंद घेत आहात. या सर्व गोष्टी करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अगदी सुयोग्य पर्यटनस्थळांची (Quiet And Peaceful Places To Travel) यादी घेऊन आलो आहोत. ओडिसा भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद मिळवण्यापासून ते वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर सूर्यप्रकाशात भिजण्यापर्यंत, ओडिसामध्ये (Odisha) तुमच्यासाठी खूप अदभुद गोष्टी आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा पूर्वेकडील राज्याला भेट देण्यासाठी अत्यंत योग्य काळ मानला जातो. ओडिसामध्ये काही मंत्रमुग्ध करणारे समुद्रकिनारे आहेत. जिथे तुम्हाला नक्कीच शांततेचा अनुभव मिळेल. इतकेच नाही तर ओडिसा हे सीफूड आवडणाऱ्या लोकांसाठी स्वर्ग आहे.

  अति उष्णतेचा शरीरातील 'या' महत्त्वाच्या अवयवावर होतो परिणाम! तुम्हाला कधी आलाय का अनुभव?

  राजस्थान जर तुम्हाला प्राचीन वास्तुकला पाहायला आवडत असतील आणि तुम्ही राजवाड्यांमध्ये राहण्याचा अनुभव घेऊ इच्छित असाल. तर राजस्थान (Rajasthan) तुमच्या यादीत अव्वल क्रमांकावर असेल. सांस्कृतिकदृष्ट्या राजेशाही राज्य असण्याबरोबरच, राजस्थानने वेगवेगळ्या काळातील आपले असंख्य राजवाडे यशस्वीरित्या जतन केले आहेत आणि त्यांचे हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. येथे तुम्ही काही काळ राजेशाही जीवनाचा अनुभव घेऊ शकता. येथे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, सरिस्का व्याघ्र प्रकल्प आणि भरतपूर पक्षी अभयारण्य यासह वन्यजीव सफारी देखील पाहू शकता. यासर्वात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण. राजस्थानमध्ये शाकाहारी लोकांसाठी दाल बाटी चुरमा आणि गट्टे की सब्जी तर मांसाहारींसाठी लाल मास प्रसिद्ध आहे.

  MOMOS: मोमोज खाताय...सावधान! अन्यथा बेतू शकतं जीवावर;AIIMS च्या डॉक्टरांचा इशारा

  केरळ शांतता आणि आल्हाददायक वातावरण असलेल्या केरळमध्ये (Kerala) टेकड्यांपासून ते शांत बॅकवॉटरपर्यंत, खूप काही पाहण्यासारखे आहे. केरळ तुम्हाला कधीही निराश करणार नाही. जर तुम्ही शहराच्या गजबजाटापासून दूर आरामशीर सुट्टी शोधत असाल, तर तुम्ही विलंब न करता मुन्नार, वायनाड, कोवलम, अलाप्पुझा आणि कुमारकोम, अलेप्पी यांसारख्या मनमोहक ठिकाणांसाठी तुमची तिकिटे बुक करा. तुम्ही येथे सीफूड आवर्जून खावे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Kerala, Odisha, Rajasthan, Travelling

  पुढील बातम्या