सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला चांगलं पेन्शन हवं? मग ही गुंतवणूक कराच

कमी वयात नोकरीबरोबरच जर का तुम्ही बचतीची सुरुवात केलीत तर तुम्ही सेवानिवृत्तीचा सुखद आनंद मिळवू शकाल.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2018 09:28 AM IST

सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला चांगलं पेन्शन हवं? मग ही गुंतवणूक कराच

मुंबई, 05 जुलै : आपल्यापैकी बरेच जण नोकरी करतात. नोकरी करताना निवृत्तीनंतर घरबसल्या पैसे कसे मिळतील, यासाठी काही गुंतवणूक केली जाते. कमी वयात नोकरीबरोबरच जर का तुम्ही बचतीची सुरुवात केलीत तर तुम्ही सेवानिवृत्तीचा सुखद आनंद मिळवू शकाल. बचतीमधून तुम्ही बऱ्याचशा आर्थिक जवाबदाऱ्या पार पाडू शकता. जाणून घेऊयात अशा काही खास योजना, ज्यामध्ये निवृत्तीनंतरच्या काळात कमी गुंतवणुकीतही चांगली पेन्शन मिळू शकेल.

नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) या योजनेमध्ये कमी वयात सुरू केलेली गुंतवणूक अपेक्षेपेक्षा अधिक रीटर्न्स देऊ शकते. नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ही एक सरकारी रिटायरमेंट सेव्हिंग स्किम आहे. ही स्किम केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004ला सुरू केली होती.

सरकारने जगभरात पॉईंट ऑफ प्रोसेस (पीओपी) बनवले आहे, ज्यामध्ये  एनपीएस अकाऊंट ओपन केले जाऊ शकते. या योजनेमध्ये  18 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत सहभागी होऊ शकतात. या योजनेत  कर सवलत देखील उपलब्ध आहे.  एनपीएसवर मुदतपूर्ती रकमेच्या 40 टक्केपेक्षा जास्त कर आकारला जातो.

किती गुंतवणुकीवर किती रीटर्न्स मिळतील?

जर तुमची कमाई 21 वर्षांपासून सुरू झाली आहे आणि याच वर्षापासून तुम्ही एनपीएसमध्ये दरमहा 1000 रुपये जमा करत आहात तर त्यानुसार तुम्ही दरवर्षी 12 हजार रुपये जमा करतंय. पुढचr 39 वर्षे ही गुंतवणूक तुम्ही नियमितपणे चालू ठेवलीत तर एनपीएसमध्ये तुमचे 4 लाख 68 हजार रुपये जमा होतात. 60 वर्षांनंतर, या ठेवीवर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. जर आपण या ठेवीवर 10 टक्के रीटर्न्स मिळाले तर एनपीएस एकूण कॅल्क्युलेशनअनुसार एकूण फंड 57.60 लाख इतका असेल.

Loading...

वरील सांगितली गेलेली रक्कम फक्त उदाहरण देण्याकरता वापरली आहे. या योजनेत तुम्ही तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2018 06:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...