मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /खास बनवा यंदाचा व्हॅलेंटाईन वीक, फेब्रुवारीत फिरण्यासाठी बेस्ट आहेत ही ठिकाणं

खास बनवा यंदाचा व्हॅलेंटाईन वीक, फेब्रुवारीत फिरण्यासाठी बेस्ट आहेत ही ठिकाणं

या काळात अनेक प्रेमी युगुलांना आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायला आवडतो. तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायचा असेल तर येथे आम्ही तुम्हलाा काही खास पर्यटनस्थळांविषयी माहिती देत आहोत

या काळात अनेक प्रेमी युगुलांना आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायला आवडतो. तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायचा असेल तर येथे आम्ही तुम्हलाा काही खास पर्यटनस्थळांविषयी माहिती देत आहोत

या काळात अनेक प्रेमी युगुलांना आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायला आवडतो. तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायचा असेल तर येथे आम्ही तुम्हलाा काही खास पर्यटनस्थळांविषयी माहिती देत आहोत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 फेब्रुवारी : बुधवारपासून फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. फेब्रुवारीला प्रेमाचा महिना देखील म्हटले जाते. महिन्याच्या सुरुवातीलाच व्हॅलेंटाईन वीकमुळे फेब्रुवारी महिना रोमान्ससाठी खूप खास मानला जातो. या काळात अनेक प्रेमी युगुलांना आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायला आवडतो. तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायचा असेल तर येथे आम्ही तुम्हलाा काही खास पर्यटनस्थळांविषयी माहिती देत आहोत.

व्हॅलेंटाईन वीकसाठी खूप खास बनवण्यासाठी तुम्ही जोडीदारासोबत सहलीची योजना आखात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. येथे आम्ही तुम्हाला फेब्रुवारीमध्ये भेट द्यायला हवी अशा काही पर्यटनस्थळांविषयी सांगत आहोत. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही सुंदर आठवणी गोळा करू शकता, ज्या तुमच्या कायम स्मरणात राहील.

निसर्गापासून दूर राहाल तर व्हाल मानसिक रुग्ण! पाहा शहरातील गजबज कशी ठरू शकते धोकादायक

अंदमान आणि निकोबार

बीचवर तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी तुम्ही फेब्रुवारीमध्ये अंदमान बेटावर सहलीची योजना आखू शकता. अंदमान आणि निकोबारच्या सहलीदरम्यान तुम्हाला अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी देखील करता येतात. तसेच येथील सूर्यास्ताचे रोमँटिक दृश्य तुमचा अनुभव आणखी सुंदर बनवते.

उदयपूर, राजस्थान

व्हॅलेंटाईन वीक राजेशाही पद्धतीने साजरा करण्यासाठी तुम्ही फेब्रुवारीमध्ये उदयपूरला जाऊ शकता. येथे आलिशान राजवाड्याला भेट देण्याबरोबरच, तुम्ही वाळवंट आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये घरेदीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

महाबळेश्वर, महाराष्ट्र

मुंबईपासून अवघ्या 263 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाबळेश्वरची गणना देशातील सुंदर हिल स्टेशनमध्ये केली जाते. तुम्ही तुमच्या जोडीदारासह फेब्रुवारीमध्ये महाबळेश्वरला जाऊन तेथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

चिकमंगळूर, कर्नाटक

फेब्रुवारीमध्ये जोडप्यांना भेट देण्यासाठी कर्नाटकातील चिकमंगळूर हे देखील सुंदर ठिकाण आहे. विशेषतः निसर्ग प्रेमी जोडप्यांसाठी चिकमंगळूरच्या सुंदर टेकड्या आणि धबधबे पाहणे हा एक संस्मरणीय अनुभव ठरू शकतो.

पुद्दुचेरीला द्या भेट

समुद्राच्या लाटांसह सभोवतालची हिरवा निसर्ग अनुभवण्यासाठी तुम्ही फेब्रुवारीमध्ये जोडीदारासोबत पुद्दुचेरीला जाऊ शकता. पुद्दुचेरीला भेट देऊन फ्रेंच संस्कृतीचीही ओळख करून घेऊ शकता.

मेघालय एक्सप्लोर करा

प्रवासाची आवड असलेल्या जोडप्यांना फेब्रुवारीमध्ये मेघालयच्या सहलीचे नियोजन करणे चांगले आहे. मेघालयातील टेकड्या, धबधबे आणि नद्यांचे मनमोहक दृश्य तुमच्या प्रवासात मोहकता वाढवू शकते.

उटी, तामिळनाडू

तामिळनाडूचे प्रसिद्ध हिल स्टेशन उटी हे जोडप्यांसाठी सर्वोत्तम डेस्टिनेशन मानले जाते. फेब्रुवारीमध्ये उटीचे हवामान खूप खास असते. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ऊटीलाही फिरू शकता.

Green Tea Side Effect : 'या' वेळेला चुकूनही पिऊ नका ग्रीन टी; फायद्यांऐवजी नुकसानच होईल जास्त

मुन्नार, केरळ

केरळच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये मुन्नारचे नाव समाविष्ट आहे. फेब्रुवारी महिन्यात मुन्नारच्या टेकड्या पूर्णपणे बहरलेल्या असतात. त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासह मुन्नारमधील चहाचे मळे आणि रोमँटिक दृश्ये पाहण्याचा आनंद घेऊ शकता. हा अनुभव तुमचा प्रवास खास बनवू शकतो.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Travelling, Valentine week