जगातलं सर्वात सुंदर इंद्रधनुष्य बघायचंय? या देशात दिसेल, वाचा काय सांगतं संशोधन

इंद्रधनुष्य कुठल्याही वयाच्या व्यक्तीला मोहात पाडतं. जाणून घ्या सर्वात सुंदर इंद्रधनुष्याबद्दल.

इंद्रधनुष्य कुठल्याही वयाच्या व्यक्तीला मोहात पाडतं. जाणून घ्या सर्वात सुंदर इंद्रधनुष्याबद्दल.

  • Share this:
    होनोलूलू (हवाई), 15 मार्च : पावसानंतर पावसाइतकंच आल्हाददायक काही असेल तर ते असतं इंद्रधनुष्य. सात रंगामध्ये प्रकाशाचा होणारा खेळ हरेकाच्या नजरेला बांधून ठेवतो. अगदी काही क्षणच दिसलं तरी इंद्रधनुष्य अद्भुत आनंद देऊन जातं. (Hawaii news) हे इंद्रधनुष्य पावसात, पाऊस पडून गेल्यावर कधीही, कुठंही दिसू शकतं. मात्र हे इंद्रधनुष्य पाहण्याचीही एखादी आदर्श, परफेक्ट जागा असू शकते. हो हे खरं आहे. संशोधनानंच यावर शिक्कामोर्तब केलं आहे. ही जागा कुठली आहे? तर हवाई.  (Hawaii rainbow research) तुम्ही हवाईत रहात असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच! मात्र नसाल राहत तरी तिथं जाऊन इंद्रधनुष्य पाहू शकता. आता असं करणं का आवश्यक आहे? तर मनोआ इथल्या हवाई युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याचं अधिकृत उत्तर दिलं आहे. या बेटाची भूप्रदेशावरील खास जागा आणि स्थिती शिवाय इथलं वातावरण या जागेला असं बनवतं. इथं सर्वात सुंदर इंद्रधनुष्य दिसू शकतं. (Hawaii rainbow most beautiful) युएच मनोआ स्कूल ऑफ ओशियन अँड अर्थ सायन्सेसचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे लेखक स्टीव्हन बासिंजर म्हणतात, 'इंद्रधनुष्याचं सांस्कृतिक महत्त्व हवाईयन भाषेत सांगितलं गेलं आहे. हवाई भाषेत इंद्रधनुष्याचं सौंदर्य आणि महती सांगण्यासाठी खूप शब्दसमूह आणि वाक्प्रचार आहेत.' (research Hawaii rainbow) हवाईयन भाषेत इंद्रधनुष्यासाठी अनेक सुंदर शब्द आहेत. जसे की, अर्थ क्लिंगिंग (uakoko), मूनबोज (anuenue kau po) हवाई भाषेच्या पुराणकथांमध्ये इंद्रधनुष्याकडे परिवर्तनाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. स्वर्ग आणि पृथ्वीमधला हा मार्ग आहे. (why Hawaii rainbow is best) हेही वाचा बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे 'हा' प्राणी तुम्हाला ओळखता येईल का ही अ‍ॅक्शन? इंद्रधनुष्य एका विशिष्ट वातावरणीय अवस्थेत बनतं. (अर्थातच पाऊस आणि सूर्यप्रकाश मिसळून) सूर्य क्षितिजावर 40 डिग्री कोनाच्या आत झुकलेला असला पाहिजे. सूर्य जितका वर जाईल तितकं इंद्रधनुष्य खाली जातं. सूर्य जसजसा पूर्वेकडे झुकत जाईल तशी दिशा महत्त्वाची बनत जाते. आणि हीच समान परिस्थिती सूर्य दुपारी पश्चिमेकडे झुकताना महत्त्वाची बनते. हेही वाचा OMG! चक्क सिंहांच्या बाजूला बसून त्याने वाजवली गिटार; पुढे काय झालं पाहा VIDEO हवाई उष्णकटिबंधीय पॅसिफिकमध्ये वसलेलं आहे. इथं सतत व्यापारी वारे वाहत असतात. सोबतच सतत पावसाचे तुषार येत जात राहतात. मात्र मुसळधार मान्सूनचा पाऊस इथं आढळत नाही. सूर्य सतत उजळपणे प्रकाशत असतो. बसिंजर सांगतात, की कशाप्रकारे रात्री समुद्राचा पृष्ठभाग तापतो आणि ढग त्याला थंड करतात. अशाप्रकारे सकाळी अतिशय सुरेख इंद्रधनुष्य दिसतं. हवाईयन पर्वतही हे इंद्रधनुष्य बनण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. बासिंजर सांगतात, की हे पर्वत नसते तर हवाई हे एक वाळवंट असतं.
    Published by:News18 Desk
    First published: