9 दिवसातला सर्वांत हिट गरबा VIDEO; हाउज द जोश?

लष्करी जवान दांडियाच्या स्टेप्स करतानाचा हा धमाल व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केला आहे. How's the josh विचारायचं कारणच नाही... असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 02:18 PM IST

9 दिवसातला सर्वांत हिट गरबा VIDEO;  हाउज द जोश?

मुंबई, 8 ऑक्टोबर : तलवारींनी खेळलेला दांडिया, जळत्या मशाली घेऊन केलेला गरबा... एवढंच नाही तर हेल्मेट घालून खेळलेला दांडियाचे व्हिडीओ या वर्षी व्हायरल झाले. पण आता नवरात्रोत्सव संपत आल्यानंतर गाजतो आहे सीमेवर लढणाऱ्या जवानांनी धरलेला ताल. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी जवान गरब्याच्या तालावर नाचतानाचा एक व्हिडीओ Twitter  शेअर केला आहे.

नवरात्राच्या पहिल्याच दिवशी त्यांनी दांडियाच्या काही चांगल्या स्टेप्स मला सुचवा, असं म्हणत व्हिडीओ पोस्ट करण्याचं आवाहन केलं होतं. फार चांगला प्रतिसाद या पोस्टला मिळाला नाही. YouTube वर असलेल्या दांडिया आणि गरबाच्या बेस्ट स्टेप्स शेअर करा असं सांगणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी मग स्वतःच एक VIDEO रीट्वीट केला. गरबाच्या स्टेप्स करणारे गणवेशातले जवान यात दिसत आहेत.

Loading...

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे याचा उलगडा होऊ शकलेला नाही.

वाचा - ही आहे जगातील सर्वात मोठी कंपनी, एका मिनिटाचं उत्पन्न आहे 15 कोटींपेक्षा जास्त

पण या व्हिडिओला प्रतिसाद म्हणून काहींनी तेलंगणातल्या पोलिसांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. गणवेशातले पोलीस यात नाचताना दिसत आहेत.

त्यामुळे वर्दीतला गरबा हा या वेळचा सगळ्यात हिट गरबा ठरला असं म्हणता येईल.

वाचा - Google वर या 8 गोष्टी चुकूनही Search करू नका; होईल मोठं नुकसान

याशिवाय उतारवयातही उत्साहाने आणि जोशात नाचणाऱ्या या गुजराती आजींचा गरबा व्हिडिओसुद्धा अनेक यूजर्सनी शेअर केला आहे.

गरब्याचा सीझन संपत आला असला तरी सोशल मीडियावर या डान्सचे व्हिडिओ फिरत राहणार.

---------------------------------

इतर काही बातम्या -

Honey Trap : SIT च्या रडावर मंत्रालय, सुंदर मुलींनी अधिकाऱ्यांना असं गंडवलं!

पोलिसाच्या बायकोची दबंगगिरी, टोल मागितला म्हणून केली नाक्याची तोडफोड

VIDEO : दुर्गा पूजा पंडालमध्ये अजान वाजल्यानं वाद, आयोजकांविरोधात तक्रार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 01:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...