सोलो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहेत या 4 जागा

एकट्याने फिरताना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो जो कुटुंबासोबत किंवा मित्र- मैत्रिणींसोबत फिरताना मिळत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 10:01 PM IST

सोलो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहेत या 4 जागा

एक वेळ अशी होती जेव्हा संपूर्ण कुटूंबासोबत फिरायला जाण्याला प्राधान्य दिलं जायचं. तसंच मुलं एप्रिल- मे महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत संपूर्ण कुटुंब बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

आता हा ट्रेण्ड बदलत चालला आहे. आता फिरण्यासाठी लोक एप्रिल- मेपर्यंत थांबतही नाहीत आणि कुटूंबासोबत फिरयला जाण्याचीही वाट पाहत नाहीत. सध्या सोलो ट्रॅव्हल ही संकल्पना ट्रेण्डमध्ये आहे.

एकट्याने फिरताना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो जो कुटुंबासोबत किंवा मित्र- मैत्रिणींसोबत फिरताना मिळत नाही. तुम्ही नवीन लोकांना भेटतात आणि कळत- नकळत हा अनुभव तुमचं आयुष्य बदलतं. जर तुम्हीही सोलो ट्रीप प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगणार आहोत जी सोलो बॅकपॅकसाठी सर्वोत्कृष्ट आहेत.

बाली- इंडोनेशियातील बाली हे बेट अतिशय सुंदर आहे. जगभरातून लोक या ठिकाणी फिरायला येतात. तुम्ही इथे आध्यात्मासोबत मजा- मस्तीही करू शकता. इथल्या रेस्तराँमध्ये तुम्ही खाण्याचा आनंद घेऊ शकता. अनेकांना वाटतं की बाली हे फक्त हनीमुन डेस्टिनेशन आहे. पण असं काही नाही. तुम्ही इथे एकटेही फिरू शकता.

कोवलम- केरळमधील कोवलम शहराला 'बीच'चं शहर असंही म्हणतात. निसर्गाचा वरदहस्त या शहराला लाभला आहे. तुम्ही इथे हाउसबोटचा आनंद लुटू शकता. लाइटहाउस बीच, कोवलम बीच, हावा बीच हे केरळमधील प्रसिद्ध बीच आहेत.

Loading...

सिक्कीम- सोलो ट्रॅव्हलिंगसाठी हा एक चांगला पर्याय आहे. इथल्या कणाकणात निसर्ग सौंदर्याचं दर्शन घडतं. पवर्तांच्यामध्ये बर्फाची चादर पांघरलेलं शहर आणि तलाव पाहणं हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असेल.

पॉण्डिचेरी- जर तुम्हाला भारतात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी पॉण्डिचेरीला जा. इथे फार वर्दळ नाही आणि प्रदूषणही नाही. इथे तुम्ही रोड ट्रीपही सहज करू शकता. इथे खूप सारे बीच आहेत जिथे तुम्ही शांत बसून संध्याकाळचा आनंद घेऊ शकता. इथे राहणंही फार महाग नाही. पॉण्डिचेरीला तुम्ही चांगलं जेवणंही स्वस्तात खाऊ शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...