Home /News /lifestyle /

Anemia Treatment : बीट खाण्याचा कंटाळा मग रक्तवाढीसाठी हे फूड कॉम्बिनेशनही ठरेल फायद्याचं

Anemia Treatment : बीट खाण्याचा कंटाळा मग रक्तवाढीसाठी हे फूड कॉम्बिनेशनही ठरेल फायद्याचं

हिरव्या भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉलिक अॅसिड यांसारखे पोषक घटक असतात. आवळा, लिंबाचा रस भाज्यांच्या रसात मिसळून प्यायल्यास शरीरात लोहाचे शोषण चांगले होते.

    मुंबई, 30 जून : वैद्यकीय भाषेत अॅनिमिया ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीर पुरेशा लाल रक्तपेशी तयार करत नाही. अशक्तपणाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लोहाची कमतरता किंवा शरीरात लोहाचे अपुरे शोषण. अॅनिमिया हा पूर्णपणे आपल्या आहारावर अवलंबून आहे, आहारात बदल करून तो बरा होऊ शकतो. व्हेरीवेलहेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, बहुतेक प्रौढ व्यक्तींनी दररोज 7 ते 18 ग्रॅम लोहाचे सेवन केले पाहिजे. तुम्ही शाकाहारी असाल किंवा गरोदर असाल तर तुम्हाला तुमच्या आहारातील लोहाच्या सेवनाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी किंवा त्याचे शोषण सुधारण्यासाठी आपण आहारात कोणते फूड कॉम्बिनेशन (Iron Deficiency Anemia Treatment) घेऊ शकता. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी 5 फूड कॉम्बिनेशन्स सायट्रिक फळांचा रस भाज्यांच्या रसात मिसळा - हिरव्या भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉलिक अॅसिड यांसारखे पोषक घटक असतात. आवळा, लिंबाचा रस भाज्यांच्या रसात मिसळून प्यायल्यास शरीरात लोहाचे शोषण चांगले होते. भाज्यांमध्ये ओवा घाला - तुम्हाला लोहयुक्त भाज्या अधिक फायदेशीर बनवायच्या असतील तर त्यात ओवा नक्की घाला. जेव्हा आपण भाजीसोबत ओवा खातो, तेव्हा लोहाचे शोषणही चांगले होते. ओवा आपण रोट्यांमध्येही घालून खाऊ शकतो. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा डाळींची भाजी बनवताना हिंग घाला - हिंग जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. डाळींमध्ये असलेल्या लोहाचे प्रमाण शरीरात वाढवायचे असेल तर फोडणीमध्ये हिंग वापरा. रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच ते रक्त पातळ करते. मनुका आणि भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्याचबरोबर बेदाण्यांमध्ये लोहाचे प्रमाणही चांगले असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी खूप फायदा होतो. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या लिंबू-पाणीसोबत लोह सप्लिमेंट घ्या - तुम्ही आयर्न सप्लिमेंट किंवा गोळ्या घेत असाल तर त्यासोबत लिंबूपाणी घ्या. काही संशोधनात असे आढळून आले आहे की, असे केल्याने लोहाची कमतरता दूर होते आणि शरीरात लोहाचे शोषण चांगले होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या