तुम्ही योग्य दिशेला झाडं लावलीत ना? नाहीतर घरात उद्भवतील समस्या

तुम्ही योग्य दिशेला झाडं लावलीत ना? नाहीतर घरात उद्भवतील समस्या

वास्तूनुसार जर योग्य दिशेला योग्य झाडं लावली नाहीत, तर वास्तूदोष निर्माण होऊ शकतो. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : घराच्या बाल्कनीत आपण झाडं लावतो. बाल्कनी नसेल तर घराच्या आजूबाजूला, गच्चीवर झाडं असतातच. घरात किंवा घराजवळ झाडं असल्यास अगदी प्रसन्न वाटतं. तुळस, गुलाब, मोगरा, कोरफड ही झाडं तर अनेकांच्या घरात पाहायला मिळतात. शिवाय ज्यांच्याकडे पुरेशी जागा आहे, त्यांच्याकडे टोमॅटो, मिरची, कोथिंबीर अशी छोट्या बागाही दिसतात. मात्र झाडं लावतानाही एक काळजी घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे योग्य दिशेला झाडं लावायला हवीत. वास्तूनुसार जर योग्य दिशेला योग्य झाडं लावली नाहीत, तर वास्तूदोष निर्माण होऊ शकतो. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे वास्तूनुसार आपल्या घरात  कोणत्या दिशेला झाडं लावणं योग्य आहे, जाणून घेऊयात.

पूर्व दिशा

वास्तूनुसार पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे. या दिशेला हिरवेगार गालिचे असायला हवेत. यामुळे सूर्याची कृपा सदैव राहते. समाजात आत्मसम्मान मिळतो. शिवाय आयुष्यात यश मिळतं, चांगलं आरोग्यही लाभतं.

पश्चिम दिशा

पश्चिम दिशा ही चंद्राची दिशा आहे, या दिशेला चमेली, बेला, कोरफड, कडीपत्ता अशी झाडं लावावीत. यामुळे घराचं वातावरण शुद्ध राहतं. शिवाय घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक विकार बळावत नाहीत.

दक्षिण दिशा

वास्तुनुसार दक्षिण दिशा मंगल दिशा मानली जाते. या दिशेला लाल रंगाच्या फुलांची झाडं लावणं शुभ असतं. यामुळे घरात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. याशिवाय रक्तासंबंधी आजारही दूर राहतात.

उत्तर दिशा

वास्तुनुसार उत्तर दिशा ही बुध ग्रहाची दिशा आहे. त्यामुळे ही दिशा मोकळी आणि हवेशीर असायला हवी. या दिशेला भरपूर हिरवळ असायला हवी. तसंच उत्तर दिशा कुबेरचंही स्थान आहे. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला तुळस, केळ्याचं झाड, झेंडू अशी झाडं तुम्ही लावू शकता. यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत

सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची पुष्टी देत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

अन्य बातम्या

'या' म्युझिकल अलार्मने तुमची मॉर्निंग होईल गूड, सुस्तीही होईल दूर

कधी विचार केलाय का? आपल्याकडून खोटं का बोललं जातं? हे आहे कारण

First published: February 11, 2020, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading