तुमचं वय जर 25 ते 35 मध्ये असेल तर नोकरीसोबत या गोष्टीही कराच, नाही तर...

फक्त ऑफिस आणि घर या पलिकडेही जग आहे आणि आयुष्य खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर फिरण्याला पर्याय असू नये.

  • Share this:

तुमचा सर्वात आवडता देश कोणता.. तुम्हाला कोणत्या देशात फिरायला जायला आवडेल.. जर तुम्ही हे निश्चित करू शकत नसाल तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत.

असे काही देश जिथे तरुणांनी नक्कीच गेलं पाहिजे. फक्त ऑफिस आणि घर या पलिकडेही जग आहे आणि आयुष्य खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर फिरण्याला पर्याय असू नये.

दक्षिण आफ्रिका- एकदा तरी या देशाला भेट दिलीच पाहिजे. इथे खऱ्या जगाची ओळख होईल. गेली अनेक वर्ष हा देश वंशभेदाशी लढत आहे. महात्मा गांधींनी त्यांच्या सुरुवातीचा काही काळ या देशात घालवला होता.

न्यूझीलंड- हा देश पाहण्यासाठी कुठल्याही एका कारणाची गरज नाही. निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या देशात तुम्हाला सुंदर स्थळांपासून ते अॅडव्हेंचर खेळांपर्यंत सर्व गोष्टी मिळतील. फिरण्यासाठी हा देश पूर्णपणे सुरक्षित आहे.

इटली- इथे तुम्ही वर्तमान आणि भूतकाळचं सुरेख मिश्रण पाहू शकता. चविष्ट जेवण, उत्तम सामाजिक जीवन हे इथलं मुख्य आकर्षण आहे. इथे एकदा आलेला व्यक्ती आयुष्यात दुसऱ्यांदाही जातोच अशी या देशाची खासियत आहे.

मालदीव- समुद्राचा स्वर्ग म्हणून मालदीवकडे पाहिलं जातं. इथे तुम्ही शांततेसोबतच समुद्राचा मनमुराद आनंद लुटू शकता. भारत ते मालदीव विमान प्रवासही स्वस्त आहे. विशेष म्हणजे इथले 100 खासगी बेट रिसॉर्ट तर जगभरात प्रसिद्ध आहेत.

ऑस्ट्रेलिया- इथे फिरण्याचा अर्थ संपूर्ण जग फिरण्यासारखं आहे. इथे प्रत्येक प्रकारचं सामाजिक जीवन पाहायला मिळतं. जगभरातील अनेक लोक या देशात राहत असल्यामुळे वेगवेगळी संस्कृती तुम्हाला इथे पाहायला मिळते. याशिवाय जगभरातील अनेक विद्यार्थी या देशात शिकायला येतात. भारतीयांचीही संख्या इथे मोठी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 02:25 PM IST

ताज्या बातम्या