मुंबई, 22 जून : बहुतेक कपल रात्रीच्या वेळीच सेक्स
(Sex) करणं योग्य समजतात. पण बहुतेक वेळा जोडीदाराची सेक्स
(Physical relation) करण्याची इच्छा नसते किंवा तुमची सेक्स करण्याची इच्छा होत नाही. कदाचित रात्रीची वेळ ही तुमच्यासाठी सेक्स करण्याची योग्य वेळ नसावी. तुम्ही सेक्स कधी करता याचा तुमच्या लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो.
सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती, कोणत्या वेळी सेक्स करणं चांगलं नाही, कोणत्या वेळी सेक्स केल्याने त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात पाहुयात.
फ्रंटिअर्स इन साइकोलॉजी जर्नलमध्ये 2018 साली प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार पुरुष आणि महिलांच्या लैंगिक इच्छा वाढण्याचा कालावधी वेगवेगळा असतो, असं वृत्त
आज तकने दिलं आहे.
संशोधनानुसार, महिलांची सर्वाधिक लैंगिक इच्छा संध्याकाळच्या वेळेस असते तर पुरुषांची सकाळी. बहुतेक कपल रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंत संबंध ठेवतात. लैंगिक संबंधांसाठी काही विशिष्य वेळ हवी असं नाही, हेसुद्धा संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. जे लोक आपला दिनक्रम लक्षात घेऊन संबंध ठेवतात ते जास्त समानधानकारक असतात, असंसुद्धा या संशोधनात दिसून आलं.
हे वाचा - मादीने घातलेली अंडी काही न खाता हा 50 दिवस ठेवतो तोंडात; किंमत तर ऐका माशाची
द पॉवर ऑफ व्हेन पुस्तकाचे लेखक माइकल ब्रुस यांनी द हेल्दी वेबसाईटला सांगितलं की, "रात्री झोपताना सेक्स करणं तसं वाईट नाही. पण यावेळी तुम्ही पूर्णपणे थकता. या वेळेत तुमच्या शरीराला फक्त झोप हवी असते आणि लैंगिक क्रियांमुळे तुमच्या शरीरात अजिबात ऊर्जा राहत नाही. त्यामुळे सकाळी सेक्स करण्याची योग्य वेळ आहे"
अमेरिकेतील रिलेशनशिप अँड सेक्स थेरेपिस्त लिसा थॉमस यांनी सांगितलं की, "प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. रात्रीच्या वेळी सेक्स केल्याने काही जणांना थकवा येतो तर काही जणांचा तणाव दूर होतो आणि शरीराला आराम मिळतो. काही जणांना सेक्स केल्यानंतर चांगली झोप येते"
दोन्ही तज्ज्ञांच्या मते, काम संपल्यानंतर रात्री एकत्र झोपल्याने शारीरिक संबंध चांगले होतात. जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमच्या शरीरात हार्मोन्स तयार होत असतात आणि तुम्ही पूर्ण ऊर्जेसह सकाळी उठता. यामुळे तुम्हाला लैंगिक समाधान मिळण्याची शक्यता जास्त असते.
हे वाचा - No Panty Day म्हणजे काय? महिला का साजरा करतायत हा दिवस?
"पण मॉर्निंग सेक्स प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे लोकांनी आपली सेक्सची वेळ ठरवणं गरजेचं आहे. तुम्ही दुपारीसुद्धा सेक्स करू शकता. आपलं लैंगिक आयुष्य चांगलं बनवण्यासाठी कपल आपल्या सोयीनुसार वेळ काढू शकतात", असा सल्लाही थॉमस यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.