Home /News /lifestyle /

HIV वर मात करणारा जगातील पहिला रुग्ण Cancer शी झुंंज हरला; बर्लिन पेशंटचा मृत्यू

HIV वर मात करणारा जगातील पहिला रुग्ण Cancer शी झुंंज हरला; बर्लिन पेशंटचा मृत्यू

HIV वर मात करून बर्लिन पेशंटने (berlin patient) इतिहास रचला मात्र कॅन्सरच्या (cancer) रूपात त्याला मृत्यूने गाठलं.

    कॅलिफोर्निया, 01 ऑक्टोबर :  एचआयव्हीसारख्या (HIV) महाभयंकर आजारावर मात करून इतिहास रचणाऱ्या रुग्णाचा कॅन्सरने (cancer) जीव घेतला. एचआयव्हीवर मात करणारा जगातील पहिला रुग्ण कॅन्सरशी झुंज हरला आहे. 54 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. टिमोथी रे ब्राऊन (Timothy Ray Brown) ज्याला बर्लिन पेशंट (Berlin patient) म्हणूनही ओळखलं जातं, याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. ब्राऊन 1993 ते 2010 साली जर्मनीतल्या  बर्लिनमध्ये राहत होता. एका कॅफेत तो काम करत होता. त्याला 1995 साली HIV झाला. त्याच्या दहा वर्षांनी म्हणजे 2007 साली त्याला अॅक्युट मेलॉइड ल्युकेमियाचंही (AML) असल्याचं निदान झालं. ल्युकेमिया हा ब्लड कॅन्सरचा एक प्रकार आहे. ज्यामुळे बोनमॅरो आणि रक्तावर परिणाम होतो. डॉक्टरांनी ब्राऊनचे AML आणि HIV हे दोन्ही आजार बरे होतील, असे उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आलं. ब्राऊनला अशा व्यक्तीचं ब्रोनमॅरो देण्यात आलं, ज्याच्या जिनमध्ये HIV ला विरोध करणारं दुर्मिळ असं म्युटेशन होतं. ज्याला CCR5-delta 32 असं म्हटलं जातं. हे वाचा - सावधान! महाराष्ट्रात येतोय कोरोनापेक्षा भयंकर काँगो फीव्हर, जाणून या तापाविषयी बोन मॅरो ट्रान्स्पलांटनंतरही ब्राऊनचे दोन्ही आजार बरे झाले. 2008 साली ब्राऊनने एचआयव्हीवर मात केली. एचआयव्हीवर मात करणारा  तो पहिला रुग्ण ठरला. एचआयव्ही पूर्णपणे बरा होऊ शकतो हे त्याने दाखवून दिलं. त्याच्यावरील उपचारामुळे अनेकांच्या आशा वाढल्या. अनेक एचआयव्हीग्रस्तांसाठी तो प्रेरणा ठरला. मात्र ब्राऊनला पुन्हा ल्युकेमिया झाला. इंटरनॅशनल एड्स सोसायटीच्या (IAS - International AIDS Society). मते,  गेल्या सहा महिन्यांपासून तो ल्युकेमियाशी लढत होता. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली. हे वाचा - कोरोनामुळे महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू जास्त का? समोर आलं धक्कादायक कारण ब्राऊनची जोडीदार टिमने आपल्या फेसबुकवर पोस्ट केली. ती म्हणाली, "अनेक एचआयव्हीग्रस्तांसाठी ब्राऊन एक प्रेरणा बनला होता. आपण कसे एचआव्हीतून बरे झालो हे तो सर्वांना सांगायचा. त्याच्यासोबत आयुष्य जगायला मिळालं, हे माझं मी नशीब समजते. मात्र आता माझा हिरो माझ्यासोबत राहिला नाही, याचा दुःख वाटतं आहे" बर्लिन पेशंटने ज्या पद्धतीने एचआयव्हीवर मात केली, त्याच पद्धतीने दहा वर्षांनी लंडन पेशंटवर उपचार करण्यात आले, जो एचआयव्हीवर मात करणारा दुसरा रुग्ण ठरला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cancer, Health

    पुढील बातम्या