बहुगुणी नारळाचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बहुगुणी नारळाचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्या देशात नारळाला अत्यंत शुभ मानले जाते आणि नारळाच्या झाडाला कल्पतरू असे संबोधले जाते. याचे कारण नारळाचे फायदे.

 • Share this:

प्रत्येकाच्या घरात असणारा नारळ आपल्याला फक्त जेवणातील गोडवा आणि चव वाढवण्यापुरता किंवा त्याची चटणी खाण्यापुरता माहित असतो. मात्र नारळाचे तेल, नारळाचे दूध आणि ओल्या आणि सुक्या खोबऱ्यापासूनही खूप फायदे आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का?

ओल्या नारळाचे फायदे

1.ओला नारळ भाजीत वरून घातल्यामुळे भाजीला स्वाद येतो. मात्र भाजी जास्तवेळ टिकत नाही त्यामुळे ओला नारळ घातलेली भाजी खराब होते.

2.ओलं खोबरं आणि गूळ शरीरासाठी चांगला असतो. त्यामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण वाढतं.

3.नारळाच्या दुधात अन्टी-मायक्रोबायल गुणधर्म असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. नारळपाण्यामुळे लघवीला सुरळीत होतं. मूत्रसंसर्ग झालेल्या व्यक्तिंनी रोज नारळपाणी प्यावं.

4.नारळाच्या दुधात व्हिटॅमीन सी, ई, के असतं. त्यामुळे केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

5.नारळाच्या दुधात सोलकडी करून ती घेतल्यानं पित्ताचा त्रास कमी होतो.

सुक्या नारळाचे फायदे

1.सुक्या नारळापासून खोबरेल तेल काढलं जातं

2. सुक्या नारळ किसून तो जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.

नारळाच्या तेलाचे फायदे

घरगुती घाणा किंवा लाकडी घाण्यावर काढलेलं नारळाचं तेल आरोग्यासाठी केव्हाही लाभदायी आहे.नारळाच्या तेलात तुम्ही रोज जेवण करू शकता. त्यानं आरोग्याला कोणताही अपाय होत नाही. नारळाच्या तेलात केलेलं जेवण फार काळ टिकत नाही. त्यामुळे जवणं योग्य वेळेत संपवणं गरजेचं असतं

1.भाजलं असेल, काळे डाग जात नसतील तर नारळाचं तेल तुम्हा त्या भागावर लावू शकता त्वरीत आराम मिळतो.

  2.खोबरेल तेल रोज केसांना लावल्यास केस काळेभोर आणि दाट होण्यास मदत होते. खोबरेल तेलाचा वापर मॉइश्चराइजर म्हणूनही करता येतो. त्वचा फुटली असेल किंवा खरखरीत झाली असेल तर खोबरेल तेल लावावं.

  3.वाट सरकली असेल किंवा उष्णतेमुळे ओटीपोटात दुखत असेल तर बेंबीमध्ये तेल सोडावं त्यामुळे पोटात दुखणं थांबतं.

  4. तळपायांना आणि हातांना झोपण्यापूर्वी तेलानं मालिश करावी. त्यामुळे हातापायाची उष्णतेनं होणारी जळजळ कमी होते.

  5.मेकअप काढण्यासाठी काहीवेळा नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. डोळ्यावर किंवा ओळांवर लावलेला मेकअप अगदी सहज काढू शकता.

  6.खोबरेल तेलाचे दोन थेंब रोज आंघोळीच्या पाण्यात टाकावेत. त्यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि कोमल राहील.

  7.फंगलइन्फेक्शन किंवा त्वचेवरील कुठलीही समस्या असेल तर त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानं खोबरेल तेलाचा वापर करू शकता.

  8.हातातील बांगड्या किंवा अंगठी निघत नसेल तर खोबरेल तेल लावून तुम्ही काढू शकता.

  9.तुमच्या घरातील खोबरेल तेल खराब झालं असेल तर ते टाकू नका त्याचा वापर तुम्ही दिवा लावण्यासाठी किंवा समईत करा. कारण खोबरेल तेलात भिजवलेली वात जास्तवेळ जळते.

  10. खोबरेल तेल रोजच्या आहारात, त्वचेला लावल्यानं तुम्हाला त्याचा फायदाच होईल. मात्र एक गोष्ट काय लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे खोबरेल तेलाचा गुणधर्म थंड असल्यानं ते पाठिला, गुडघ्याला लावू नये. त्यामुळे वात वाढण्याची शक्यता असते

  First published: April 5, 2019, 7:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading