मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits of Yoga : फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार; जाणून घ्या फायदे आणि योग्य पद्धत

Benefits of Yoga : फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार; जाणून घ्या फायदे आणि योग्य पद्धत

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात

सूर्यनमस्कार (Surya Namaskar ) शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणारा योगाभ्यास आहे. पण सूर्य नमस्कार करण्याची योग्य पद्धत फारच कमी लोकांना माहिती आहे. पाहा हा VIDEO

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 18 मे : सूर्यनमस्कार (Surya Namaskar )  चैतन्य आणि उर्जाने भरलेली एक मुद्रा आहे. याशिवाय छोट्या छोट्या योगाभ्यासाने शरीर निरोगी (Healthy Body) राहून. ट्रेस (Stress) ही कमी होतो. योगा केल्याने एकाच दिवसात फरक पडत नाही. त्यामुळे निरोगी शरीरासाठी दररोज योगा केला पाहिजे. सरावानेच योगा करण्याची सवय लागेत. सूर्य नमस्कार, श्वासोच्छवासाचे व्यायाम करायला हवेत. सूर्यनमस्कार म्हणजे संपूर्ण व्यायाम. सूर्यनमस्काराने शरीर लवचिक होतं आणि चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात येतं.

(Cyclone Tauktae: चक्रीवादळानं दिशा बदलली; मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता)

सूर्य नमस्कार (Surya Namaskar )  सूर्य नमस्कार शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणारा योगाभ्यास आहे. पण सूर्य नमस्कार करण्याची योग्य पद्धत फारच कमी लोकांना माहिती आहे. प्रणम आसन:हे आसन करण्यासाठी सर्वातआधी दोन्ही पायांचे पंजे जोडून उभे रहा. नंतर, दोन्ही हात खांद्याला समांतर घ्या आणि संपूर्ण वजन दोन्ही पायांवर बॅलन्स करा. त्यानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना चिकटून ठेवा आणि अभिवादन मुद्रेत उभे रहा.

हस्तातुनासन :

हे आसन करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वरच्या बाजूला करा. आता हात आणि कंबर वाकवत दोन्ही हात आणि मानही मागच्या बाजूला टेकवा.

हस्तपद आसनः

आता हळू हळू श्वास सोडत पायांच्या दिशेने वाका. आपले दोन्ही हात कानाजवळून पुढे घेत जमिनीला स्पर्श करा.

अश्वसंचालन आसन:

या आसनात आपले हात जमिनीवर ठेवा,श्वास घेताना उजवा पाय मागे घ्या आणि डावा पाय गुडघ्यापासून वाकवा. मान वरच्या बाजूला करा आणि काही काळ याच स्थितीत रहा.

(कोरोनावर मात केली तरी तुमचं आरोग्य धोक्यात; या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका)

पर्वतासन:

श्वास घेत डावा पाय मागे घ्या आणि संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आणा आणि आपले हात जमिनीवर सरळ ठेवा.

प्लांकिंग पोजः

प्लँकिंग पोजमुळे पचन सुधारतं. वजन कमी करण्यासाठीही उपयोग होतो. प्लॅकिंगमुळे शरीरात लवचिकता येते. यामुळे कॉलरबोन,खांद्याचे स्नायू देखील ताणले जातात. यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात. कॅलरी बर्नमुळे शरीरात ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण होते.

अष्टांग नमस्कार:

हे आसन करताना आपले दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवा आणि श्वास घ्या. बट वरच्या बाजूस उंच करा आणि छाती आणि हनुवटीने जमिनीवर स्पर्श करा. या स्थितीत काही काळ रहा.

भुजंगासन:

हे आसन करत असताना श्वास सोडत हळूहळू आपली छाती पुढे घ्या. हात सरळ जमिनीवर ठेवा. मान मागे खेचा आणि दोन्ही पाय सरळ ठेवा.

(Dementia: स्मृतिभ्रंशावर औषधं घ्याच, पण त्याबरोबर करा हे उपाय, होईल फायदा)

शवासन :

पाठीवर पडून डोळे बंद करा. आपले पाय रिलॅक्स ठेवा. पायांचे तळवे आणि बोटं वरच्या बाजूस असावेत. हाताचे तळवे वरच्या बाजूस ठेवा. पायापासून शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करा आणि हळू हळू श्वास बाहेर सोडा. शरीरात रिलॅक्स झाल्यावर, डोळे बंद करा आणि याच मुद्रत थोडावेळ विश्रांती घ्या.

संतुलनासन :

यासाठी आपल्या गुडघ्यावर बसा आणि हाताचे तळवे सरळ रेषेत जमिनीवर ठेवा. आता नितंब वर घ्या आणि गुडघे सरळ करा. हात सरळ ठेवा आणि समोरील कोणत्याही बिंदूवर लक्ष केंद्रीत करा.

सूर्य नमस्काराचे फायदे:

सूर्यनमस्कार केल्याने ताणतणाव दूर होतो, बॉडी डिटॉक्स होते आणि लठ्ठपणा कमी होतो. मासिक पाळीच्या समस्या असलेल्या स्त्रियांसाठी हे खूप फायदेशीर आहे. पाठीचा कण मजबूत आहे.

सूर्यनमस्कार कोणी करु नये : गर्भवती महिला,हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण यांनी सूर्य नमस्कार करू नये. पाठदुखीचा त्रास होत असेल तर सूर्य नमस्कार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. महिलांनी पाळीच्या काळात सूर्यनमस्कार करू नये.

First published:

Tags: Health, Yoga