मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बंगळुरूतला हा पोस्टमन गिटार वाजवून लोकांना करतोय मंत्रमुग्ध

बंगळुरूतला हा पोस्टमन गिटार वाजवून लोकांना करतोय मंत्रमुग्ध

कोरोना (Corona) महामारीच्या (Pandemic) काळात नकारात्मक बातम्यांचं प्रमाण अधिक आहे; पण प्रेरणा देणाऱ्या बातम्याही आहेत.

कोरोना (Corona) महामारीच्या (Pandemic) काळात नकारात्मक बातम्यांचं प्रमाण अधिक आहे; पण प्रेरणा देणाऱ्या बातम्याही आहेत.

कोरोना (Corona) महामारीच्या (Pandemic) काळात नकारात्मक बातम्यांचं प्रमाण अधिक आहे; पण प्रेरणा देणाऱ्या बातम्याही आहेत.

बंगळुरु, 11 डिसेंबर : कोरोना (Corona) महामारीच्या (Pandemic) काळात नकारात्मक बातम्यांचं प्रमाण अधिक आहे; पण प्रेरणा देणाऱ्या बातम्याही आहेत. अशीच एक बातमी आहे कर्नाटकची (Karnataka) राजधानी असलेल्या बेंगळुरू (Bengaluru) शहरातली. तिथली जेरार्ड लिओ अँथनी (Gerard Leo Anthony) नावाची व्यक्ती गिटार (Guitar) वाजवून लोकांना आकर्षित करत आहे. प्रेमाने त्यांना लिओ या नावानं संबोधलं जातं. सर्वांत महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट ही, की ही व्यक्ती गेली 27 वर्षं पोस्टमन (Postman) म्हणून बेंगळुरूच्या कानाकोपऱ्यांमध्ये कार्यरत आहे. उत्तर बेंगळुरूच्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या या गिटारवादक-पोस्टमनला (Guitarist) सोशल मीडियामुळे (Social Media) लोकप्रियता मिळाली. पूर्वीपासूनच त्यांना गिटारवादनाचा छंद होता; मात्र त्याविषयी फार जणांना माहिती नव्हतं. आता मात्र लिओ यांचे व्हिडिओ (Videos) शॉर्टव्हिडिओ फायरवर्कच्या माध्यमावर बरेच पाहिले जात आहेत. अन्य वादक आणि लिओ यांच्यात फरक हा आहे, की गिटार वाजवताना लिओ पोस्टमन म्हणून काम करताना आलेले अनुभवही मध्ये-मध्ये सांगतात. अगदी किशोरवयात असल्यापासूनच लिओ यांना गिटार वाजवण्याचा आणि गाण्याचा छंद होता. सुरुवातीच्या काळात ते शहरातले वेगवेगळे पब आणि रेस्तराँमध्ये संध्याकाळच्या वेळात गिटार वाजवून लोकांचं मनोरंजन करायचे. त्यातून त्यांना पॉकेटमनी तर मिळायचाच आणि त्यांचा छंदही जोपासला जायचा. शाळेत आणि चर्चमध्येही ते नियमितपणे गिटार वाजवायचे. खरं तर ते संगीतकारच व्हायचे; पण ते पोस्टमन बनले. लिओ आता 56 वर्षांचे आहेत. ते म्हणतात, की पोस्टातलं काम मला जणू वारसा म्हणूनच मिळालं आहे. त्यांचे वडीलही पोस्ट खात्यात नोकरीला होते आणि लिओही 1995मध्ये त्याच खात्यात नोकरीला लागले. हे वाचा - WWE सुपरस्टार काहीच नाही, मुंबईजवळील फाइट क्लब VIDEO व्हायरल पोस्ट खात्यात आल्यानंतरही लिओ यांचा गिटारवादनाचा छंद सुरूच राहिला आणि तो वाढतच गेला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहराच्या कानाकोपऱ्यांत पत्रं, पार्सलं वाटण्यासाठी त्यांना दररोज बराच प्रवास करावा लागतो. त्या दरम्यान त्यांना गिटार वाजवण्यासाठी रिकामा वेळच मिळायचा नाही. म्हणून त्यांनी एक कल्पना लढवली. कामासाठी प्रवास करत असतानाच ते एखाद्या नव्या चालीबद्दल विचार करायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी आल्यावर त्याची प्रॅक्टिस करायचे. लिओ यांचं काम आणि त्यांची आवड या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या, तरी त्यांनी आपली आवड जोपासली. कामाच्या वेळेतही कधी मोकळा वेळ मिळालाच, तरीही ते आवर्जून गिटार वाजवायचे. लिओ यांच्या या पॅशनमुळेच आज त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. ज्यूकबॉक्स 300 (Jukebok 300) नावाच्या एका बँडमध्ये (Band) ते प्रमुख गायक आणि गिटारिस्ट म्हणून कार्यरत आहेत. संगीत ही समान आवड असलेल्या चार मित्रांसोबत मिळून त्यांनी हा बँड सुरू केला आहे. हा बँड शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये क्लब, पार्टी आदींमध्ये संगीत सादरीकरण करतो. हे वाचा - अमेरिकेतील सिरिअल किलरच्या कोड मेसेजचा अर्थ 51 वर्षांनी उलगडला पोस्ट ऑफिसमधल्या कामाची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडल्यावर उरलेल्या वेळात लिओ आपली ही आवड जोपासत आहेत. मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये गिटार आणि आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लिओ यांना अनेक लोक आता ओळखू लागले आहेत. लोक त्यांना जवळ येऊन विचारतात, की तुम्ही तेच पोस्टमन आहात का, की अमुक अमुक दिवशी तुम्हाला रस्त्यावर किंवा शेजारी पाहिलं होतं? आणखी काही वर्षांत लिओ पोस्ट खात्यातून निवृत्त होतील. त्यानंतर आराम करायचं सोडून आपल्या या छंदाला पूर्ण वेळ वाहून घ्यायचा त्यांचा विचार आहे. इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये गाणी लिहून ती संगीतबद्ध करण्याची त्यांची इच्छा आहे. कन्नड फिल्म प्रोजेक्टशीही ते संबंधित असून, चित्रपटांमध्ये गिटारच्या वापराबद्दल ते चर्चा करतात.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona, World After Corona

पुढील बातम्या