बंगळुरू, 29 डिसेंबर : शॉपिंग करणं असो किंवा खाणंपिणं असो जिथं ऑफर (offer) असते तिथं प्रत्येक जण पळतो. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी विक्रेते वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. त्याच्या जाहिरीती करत असतात आणि ग्राहकही यांना भुलतात. कमीत कमी किमतीत जास्त आणि चांगली वस्तू मिळवण्याचा प्रयत्न ग्राहकांचा असतो. पण कधीकधी पैसे बचत करण्याच्या नादात अशी ऑफर्सकडे वळणं चांगलंच महागात पडू शकतं. असाच फटका बसला आहे तो बंगळुरूतील एका महिलेला.
या महिलेनं फेसबुकवरील जाहिरात पाहून ऑनलाइन ऑर्डर दिली आणि 250 रुपयांच्या बदल्यात 50,000 रुपये गमावून बसली. येलाचेनाहल्लीतील 58 वर्षांच्या सविता शर्मा यांनी फेसबुकवर खाण्याबाबत आकर्षक अशी जाहिरात पाहिली. Buy 1 get 2 ची ही ऑफर होती. एक थाळी घेतल्यावर त्यावर दोन थाळी फ्री होत्या. एका थाळीची किंमत 250 रुपये होती. म्हणजे दोन थाळ्यांचे तब्बल 500 रुपयांची बचत होत होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ज्या रेस्टॉरंटनं ही जाहिरात दिली होती त्याचा पत्ता सदाशिवनगरमधील होता. तसंच जाहिरातीत फोन नंबरही देण्यात आला होता. सविता यांनी त्या क्रमांकावर फोन केला. समोरून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं 10 रुपये भरून ऑर्डर बुक करायला सांगितलं आणि बाकीचे पैसे डिलीव्हरी मिळाल्यानंतर देण्यास सांगितले.
हे वाचा - सलग दुसऱ्या दिवशी किमतीत वाढ; तरी 50,000 रु. पेक्षा कमी दर; मंगळवारची Gold price
पण दहा रुपयांचं सुरुवातीचं पेमेंट करण्यासाठी त्या व्यक्तीनं सविता यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. तो एक फॉर्म होता. ज्यामध्ये सविता यांनी आपलं डेबिट कार्ड आणि पिन नंबर भरला. जसा हा फॉर्म सबमिट केला तेव्हाच त्यांच्या बँक खात्यातून 49,996 रुपये उडाले. त्यांना याचा मेसेज आला.
सविता यांनी त्या जाहिरातीतील क्रमांकावर पुन्हा फोन केला. तर फोन बंद होता. आपली फसवणूक झाल्याचं सविता यांना समजलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ तक्रार केली. साउथ इकनॉमिक ऑफेंस नारकोटिक्स (CEN) पोलीस ठाण्यात त्यांनी आपली तक्रार दिली.
हे वाचा - तुम्ही LIC पॉलिसी घेणार असाल तर या बाबतीत व्हा सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे
त्यामुळे तुम्हीदेखील अशा ऑनलाईन जाहिराती पाहून त्यातील ऑफरला भुलू नका. कृपया आपल्या बँकेची माहिती कुणासोबतही शेअर करू नका. नाहीतर तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Cyber crime, Facebook