मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जोडव्यांमुळे पतीचेच नाही पत्नीचेही वाढते आयुष्य, जुही चावलाने सांगितले महत्त्व

जोडव्यांमुळे पतीचेच नाही पत्नीचेही वाढते आयुष्य, जुही चावलाने सांगितले महत्त्व

पूर्वापार चालत आलेल्या वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या पेहरावापासून, दागिन्यांपासून ते परंपरांपर्यंत अनेक गोष्टीचं आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान असते. असाच एक अलंकार आहे जोडवे. 

पूर्वापार चालत आलेल्या वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या पेहरावापासून, दागिन्यांपासून ते परंपरांपर्यंत अनेक गोष्टीचं आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान असते. असाच एक अलंकार आहे जोडवे. 

पूर्वापार चालत आलेल्या वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या पेहरावापासून, दागिन्यांपासून ते परंपरांपर्यंत अनेक गोष्टीचं आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान असते. असाच एक अलंकार आहे जोडवे. 

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 जानेवारी : भारत हा विविधतेचा देश आहे. येथील विविध धर्माचे आणि समुदायाचे लोकांमध्ये अनेक प्रकारच्या श्रद्धा आणि मान्यता आहे, तसेच त्यामागील वैज्ञांनिक कारणे देखील आश्चर्यकारक आहेत. अनेक प्रथा आणि मान्यतांच्या मुळाशी गेल्यास लक्षात येते की, आपले पूर्वज आजच्या तुलनेत खरोखरच अधिक विकसित होते. पूर्वापार चालत आलेल्या वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या पेहरावापासून, दागिन्यांपासून ते परंपरांपर्यंत अनेक गोष्टीचं आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान असते.

असाच एक अलंकार आहे जोडवे. हिंदू धर्मातील बहुतांश विवाहित महिला पायांच्या बोटात जोडवे घालतात हे तुम्हाला माहिती असेलच, सहसा पायाच्या अंगठ्याजवळील दुसऱ्या बोटांमध्ये जोडवे घातले जातात. परंतु केवळ श्रद्धा किंवा प्रथा म्हणून जोडवे घातले जात नाहीत, तर त्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. हे कारण प्रत्येक स्त्रीने जाणून घेणे महत्वाचे आहे.

'या' आजारामुळे वाढतंय मिस यूनिव्हर्स हरनाझ संधूचं वजन, वाचा किती धोकादायक

जुही चावलाने शेअर केला जोडव्यांचा फोटो

अलीकडेच बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने पायात जोडवे घातले आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये 'आमच्या मुळांकडे वापसी' असे कॅप्शन देत त्याचे आरोग्यविषयक फायदे शेअर केले आहेत. जोडवे ही एक प्राचीन परंपरा आहे जी हार्मोन्स संतुलित करते. या एकवेळच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला कोणत्याही उर्जेशिवाय दिवसभर अॅक्युप्रेशरचे फायदे मिळतात आणि आयुष्यभराची हमी मिळते', असे जुहीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महिलांच्या आरोग्याला होतो फायदा

पायाच्या दुसऱ्या बोटाच्या नसा थेट हृदयाशी आणि स्त्रियांच्या गर्भाशयाशी जोडलेल्या असतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत या बोटावर जोडव्यामुळे दाब येतो, तेव्हा शिरा देखील दाबल्या जातात. यामुळे नसांमध्ये रक्त परिसंचरण देखील सुरळीत होते. जोडवे हे एक्यूप्रेशरचे काम करतात. त्यामुळे महिलांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि गर्भाशयात जाणारे रक्तही व्यवस्थित वाहते. जोडवे घातल्यामुळे मासिक पाळीत कोणतीही समस्या येत नाही.

पीरियड्स सुरळीत होतात

ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी येण्याच्या तक्रारी आहेत त्यांनी जोडवे घातल्यास फायदा होतो. आयुर्वेदानुसार पायाच्या दुसऱ्या बोटाची नस थेट स्त्रीच्या गर्भाशयाशी जोडलेली असते. जोडव्यामुळे बोटावर पडणारा थोडासा दाब मासिक पाळी नियमित करण्यासाठी फायदेशीर ठरतो. जोडव्यांमुळे गर्भाशय निरोगी ठेवण्यास मदत होते.

Food Combination : पालक पनीर खरंच आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? मोठा गैरसमज होईल दूर

चांदीचेच जोडवे का घातले जातात?

पायत केवळ चांदीचेच जोडवे का घातले जातात असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? कारण महिला कधीच सोन्याचे जोडवे परिधान करत नाही. यामागेही एक खास कारण आहे. हिंदू धर्मात सोन्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे हिंदू स्त्रिया कमरेच्या खाली सोन्याचे कोणतेही दागिने घालत नाहीत कारण हा देवीचा अपमान मानला जातो. दुसरे कारण म्हणजे चांदीला विजेचा चांगला वाहक मानला जातो. चांदी पृथ्वीवरील ध्रुवीय ऊर्जा शोषून घेते आणि आपल्या शरीरात प्रसारित करते.

View this post on Instagram

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle