मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits of Vitamin B-12: आरोग्याशी निगडित 'या' समस्या व्हिटॅमिन बी-12 मुळे होतात दूर

Benefits of Vitamin B-12: आरोग्याशी निगडित 'या' समस्या व्हिटॅमिन बी-12 मुळे होतात दूर

 बी-12 हे अत्यंत महत्त्वाचं व्हिटॅमिन मानलं जातं. वाढत्या वयामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने सांधेदुखी, स्मृतिभ्रंश, मस्क्युलर डिग्रेडेशन यांचा समावेश असतो. या समस्या टाळण्यासाठी बी-12 व्हिटॅमिन गरजेचं असतं.

बी-12 हे अत्यंत महत्त्वाचं व्हिटॅमिन मानलं जातं. वाढत्या वयामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने सांधेदुखी, स्मृतिभ्रंश, मस्क्युलर डिग्रेडेशन यांचा समावेश असतो. या समस्या टाळण्यासाठी बी-12 व्हिटॅमिन गरजेचं असतं.

बी-12 हे अत्यंत महत्त्वाचं व्हिटॅमिन मानलं जातं. वाढत्या वयामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने सांधेदुखी, स्मृतिभ्रंश, मस्क्युलर डिग्रेडेशन यांचा समावेश असतो. या समस्या टाळण्यासाठी बी-12 व्हिटॅमिन गरजेचं असतं.

पुढे वाचा ...
मुंबई, 09 ऑगस्ट: उत्तम आरोग्यासाठी शरीराला सर्व व्हिटॅमिन्स मिळणं गरजेचं असतं. शरीरात एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाली, तर शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. काही वेळा गंभीर आजारांमुळे शरीरात व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होऊ शकते. अशा वेळी डॉक्टर व्हिटॅमिन्सची औषधं घेण्याचा सल्ला देतात. शारीरिक हालचाल आणि अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी व्हिटॅमिन्स गरजेची असतात. यात बी-12 हे अत्यंत महत्त्वाचं व्हिटॅमिन मानलं जातं. वाढत्या वयामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. त्यात प्रामुख्याने सांधेदुखी, स्मृतिभ्रंश, मस्क्युलर डिग्रेडेशन यांचा समावेश असतो. या समस्या टाळण्यासाठी बी-12 व्हिटॅमिन गरजेचं असतं. शरीर स्वतःहून हे व्हिटॅमिन तयार करू शकत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो. गरज पडल्यास सप्लिमेंट्सही घ्यावी लागतात. प्राणिजन्य, तसंच अन्य काही पदार्थांमध्ये हे व्हिटॅमिन नैसर्गिकरित्या आढळतं. त्यामुळे असे पदार्थ नियमित सेवन करणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. आरोग्यासाठी बी-12 हे अत्यंत महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. हेल्थ शॉट्स डॉट कॉमने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 'फूड डाटा सेंट्रल'ने दिलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन बी-12 अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतं. त्याशिवाय दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे या व्हिटॅमिनचा मुख्य स्रोत आहेत. मासे, शेलफिश, अ‍ॅनिमल लिव्हर आणि किडनी, रेड मीट, चीज, योगर्ट आणि सोयाबीन यांसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातली व्हिटॅमिन बी -12 ची कमतरता दूर होऊ शकते. फोर्टिफाइड न्यूट्रिशनल यीस्ट आणि सॅल्मन ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध आहेत. तसंच यात बी व्हिटॅमिनही मुबलक असतं. हेही वाचा - Protein Side Effect : वजन कंट्रोल करण्यासाठी भरपूर प्रोटीन घेताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम व्हिटॅमिन बी -12 चं पुरेसं सेवन दीर्घ काळ हाडांचं आरोग्य राखण्यास मदत करतं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनने केलेल्या अभ्यासानुसार, ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता होती, त्यांच्यात हाडांची खनिज घनता सामान्य व्यक्तींपेक्षा लक्षणीय प्रमाणात कमी असल्याचं दिसून आलं. वाढत्या वयानुसार ही कमतरता हाडांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. अजून एका अभ्यासानुसार, व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरेमुळे ऑस्टिओपोरॉसिससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या विशेषतः महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. व्हिटॅमिन बी-12 युक्त पदार्थांचा एनर्जी बूस्टर  म्हणून वापर केला जातो. `नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन`ने प्रकाशित केलेल्या एका माहितीनुसार, व्हिटॅमिन बी-12 शरीरात ऊर्जानिर्मितीसाठी प्रमुख स्रोत मानला जातो. परंतु, या संकल्पनेला पुष्टी देणारं कोणतंही शास्त्रीय संशोधन आतापर्यंत समोर आलेलं नाही, असंदेखील यात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचवेळी अन्य एका अभ्यासात, व्हिटॅमिन बी-12 सप्लिमेंट्स शरीरातली ऊर्जा पातळी वाढवतात. वाढत्या वयाबरोबर तुमचं शरीर चपळ आणि सक्रिय ठेवण्यासाठीदेखील हे उपयुक्त ठरतं. हेही वाचा - ऐकावं ते नवलच! डास, माशांना पळवण्यासाठीही मोबाईल अ‍ॅप; धूर आणि उग्र वासापासून होईल सुटका व्हिटॅमिन बी-12 शरीरात लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देतं. पब मेड सेंट्रलने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होते. तसंच या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींचा आकार बदलून त्या थोड्या मोठ्या होतात. यामुळे त्यांचा बोनमॅरो अर्थात अस्थिमज्जा ते रक्तवाहिन्यांपर्यंतचा प्रवास योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही. व्हिटॅमिन बी-12 मुळे मस्क्युलर डिग्रेडेशन  अर्थात स्नायूंचा ऱ्हास होण्याची शक्यता कमी होते. व्हिटॅमिन बी-12 सप्लिमेंटमध्ये होमोसिस्टीन फारच कमी प्रमाणात असतं. होमोसिस्टीन हे रक्तात आढळणारे एक प्रकारचं अमिनो आम्ल आहे. रक्तवाहिन्यांमध्ये याचं प्रमाण जास्त असेल तर वाढत्या वयानुसार स्नायूंचा ऱ्हास होऊ शकतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनने केलेल्या एका अभ्यासात 40 आणि त्याहून अधिक वर्षं वयाच्या 5000 महिलांचा समावेश केला गेला. त्यांच्या आहारात पुरेशा प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी-6 सोबत बी-12चा समावेश करण्यात आला. यापैकी अनेक महिलांना त्यांच्या मस्क्युलर डिग्रेडेशनशी संबंधित समस्यांमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून आलं. पब मेड सेंट्रलने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, व्हिटॅमिन बी-12 त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. हायपरपिग्मेंटेशन, नेल डिस्कलरेशन, स्किन एजिंग, हेअर एजिंगसह तोंडाच्या कोपऱ्यावर तडे जाणं यांसारख्या समस्यांवर हे व्हिटॅमिन प्रभावी ठरतं. यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. तसंच अकाली वृद्धत्व दूर ठेवता येतं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, त्वचेशी संबंधित समस्या दूर व्हाव्यात यासाठी अनेक त्वचाविकारतज्ज्ञ व्हिटॅमिन बी-12 सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या