मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बाळाच्या डायपरचे रॅशेस कमी करायचे आहेत? करा या ऑईलने मसाज

बाळाच्या डायपरचे रॅशेस कमी करायचे आहेत? करा या ऑईलने मसाज

बाळाच्या मसाज (Massage)साठी कोणतं तेल वापरायचं असा प्रश्न अनेकदा आयांना पडतो. बाळासाठी उफयुक्त असे अनेक घटक ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)मध्ये असतात. जाणून घेऊया ऑलिव्ह ऑईलच्या मसाजचे फायदे.

    मुंबई, 25ऑक्टोबर:  लहान मुलांची त्वचा (Baby Skin) कायम कोमल आणि मुलायम रहावी, त्यांच्या शरीरात ताकद यावी आणि मुलांना त्वचेच्या कोणत्याही समस्या येऊ नयेत यासाठी मुलांना मालिश (Massage) केलं जातं. मुलांना मालिश केल्यामुळे त्यांना चांगली झोपही येते. त्यांची तब्येतही सुधारते. लहान मुलांना कोणत्या तेलाने मालिश करायचं याबाबत आयांना नेहमी संभ्रम असतो. बदामाचं तेल, तिळाचं तेल नेहमीच मालिशसाठी वापरलं जातं. पण ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्यामुळेदेखील मुलांना अनेक फायदे होतात. केसांनाही ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) लावल्यामुळे खूप फायदा होतो. ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्यामुळे होतात 'हे' फायदे त्वचा कोमल होते: ऑलिव्ह ऑईलच्या तेलाने बाळाला माशिल केलं तर बाळाची त्वचा अत्यंत मऊ, मुलायम होते. काही तेलांचा वापर आपण फक्त उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातच करू शकतो. पण ऑलिव्ह ऑईलचा वापर 12 महिने करता येतो. पण योग्य प्रमाणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करणं गरजेचं आहे. केसांसाठी उपयुक्त: मुलांच्या डोक्यालाही ऑलिव्ह ऑईल वापरल्यास त्यांच्या केसातला कोंडा कमी होतो. केस मजबूत होतात. केसांसोबतच नखांनाही ऑलिव्ह ऑईलचा फायदा होतो. नखांना चमक येते. डायपरचे रॅश कमी होतात: डायपर वापरल्यामुळे मुलांना अनेकदा रॅशेस येतात. ऑलिव्ह ऑईलच्या वापरामुळे डायपरचे रॅशेसही कमी होतात. बाळाची पोटदुखी कमी होते: बाळाला अनेकदा गॅसेस होतात, पोट दुखतं. अशा आजारांवरही ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे. बाळाच्या पोटावर हलक्या हाताने मालिश केल्यास गॅसेसमुळे होणारी पोटदुखी थांबते. येत्या थंडीमध्ये बाळाला ऑलिव्ह ऑईलने मसाज करा. पण ऑलिव्ह ऑईलचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्लादेखील घ्या.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Lifestyle, Small baby

    पुढील बातम्या