मुंबई, 29 जानेवारी : डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, असंतृप्त चरबी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम असतात. डाळिंब आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर असतातच. पण तुम्हाला माहिती आहे का? डाळिंबाचा तुमच्या त्वचेवरही चांगला प्रभाव पडतो. डाळिंब त्वचेला नैसर्गिक चमक देऊ शकतात. डाळिंबाप्रमाणेच डाळिंबाची सालही आपल्या त्वचेसाठी खूप फायद्याची असते.
यामुळे डाळिंबाच्या सालीचा हा फेसपॅक कसा बनवायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डाळिंबात एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते, पिंपल्स कमी होतात. तसेच सनस्पॉट्स आणि पिगमेंटेशनसारख्या समस्यांवरही डाळिंबाची साल फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया डाळिंबाचा फेस मास्क बनवण्याची पद्धत.
असा बनवा डाळिंबाच्या सालीचा फेसपॅक
हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला डाळिंबाची साल आणि गुलाब पाणी लागेल. डाळिंबाच्या साली स्वच्छ करून एका भांड्यात घ्या. नंतर यात थोडे पाणी टाकून चांगले उकळा. त्यानंतर हे पाणी थंड होऊ द्या. नंतर हे पाणी व्यवस्थित गाळून एका भांड्यात काढा. त्यानंतर पाण्यात एक लहान झाकण गुलाब जल टाका. मग हे व्यवस्थित एकत्र करा. अशाप्रकारे तुमचा डाळिंबाच्या सालीचा फेस मास्क तयार आहे.
असा वापरा डाळिंबाच्या सालीचा फेसपॅक
डाळिंबाच्या सालीचा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. मग हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 10 मिनिटे कोरडे होऊ द्या. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. चांगल्या प्रभावासाठी हा फेसपॅक लावून 2 मिनिटांपर्यंत फेस स्टीम घ्या. तुम्ही आठवड्यातून 2 वेळा हा वापरू शकता.
डाळिंबाच्या सालीचे त्वचेला होणारे फायदे
- त्वचा हायड्रेट ठेवते.
- पिंपल्स आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते.
- सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्व येण्यापासून रोखते.
- त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
- त्वचेच्या पेशींच्या पुनरुत्पादनास चालना मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fruit, Health, Health Tips, Lifestyle, Skin care