मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Onion benefits : लाल की पांढरा, आरोग्यासाठी कोणता कांदा चांगला?

Onion benefits : लाल की पांढरा, आरोग्यासाठी कोणता कांदा चांगला?

कांदा असला तरी पांढरा आणि लाल कांद्यातले काही गुणधर्म वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्याचे फायदेही वेगळे आहेत.

कांदा असला तरी पांढरा आणि लाल कांद्यातले काही गुणधर्म वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्याचे फायदेही वेगळे आहेत.

कांदा असला तरी पांढरा आणि लाल कांद्यातले काही गुणधर्म वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्याचे फायदेही वेगळे आहेत.

मुंबई, 13 जुलै : स्वयंपाकात कांदा सगळीकडेच वापरला जातो. लाल आणि पांढरा असे कांद्याचे दोन प्रकार आहेत हे आपल्याला माहिती आहे. यातला लाल कांदा तर आपण सहसा स्वयंपाकात वापरतोच. पण पांढरा कांदा सहसा स्वयंपाकात वापरला जात नाही. अनेकदा आपण तो कच्चाच खातो. पण आरोग्याला होणाऱ्या फायद्याच्या बाबती म्हणायचं झालं तर नेमका कोणता कांदा चांगला आहे, हे पाहुयात (Benefits of onion).

पांढरा कांदा आणि लाल कांद्यातले बरेच गुणधर्म सारखे आहेत; पण त्यात काही गुणधर्म असे आहेत, ज्यामुळे पांढरा कांदा लाल कांद्यापेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. लाल कांद्यापेक्षा पांढऱ्या कांद्यात अँटीबायोटिक आणि दाह कमी करण्याचे गुणधर्म अधिक असतात. तसंच पांढरा कांदा लाल कांद्यापेक्षा कमी तिखट असतो.

प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पांढऱ्या कांद्याचे फायदे सांगितले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कांदा उष्माघात आणि उष्णतेमुळे होणाऱ्या दाहावर गुणकारी आहे. पांढरा कांदा शरीरातली उष्णता कमी करतो. फायबरचा उत्तम स्रोत असतो, प्रतिकारशक्ती वाढवतो, हृदयाचं आरोग्य सुधारतो. यामध्येअँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार न्यूट्रिशनिस्ट डॉ. रचना अग्रवाल यांनी सांगितलं, "पांढरा कांदा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. त्याच्यामध्ये दाह म्हणजे शरीरातली जळजळ कमी करण्याचे, तसंच अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. आयुर्वेदात तर त्याला अतिशय उच्च दर्जाचं मानलं गेलं आहे"

हे वाचा - Black Rice For Cancer : कॅन्सरपासून वाचवतो हा तांदूळ; यामध्ये आहे खास घटक

डॉ. रचना अग्रवाल यांनी पांढऱ्या कांद्याचे आणखी काही फायदे सांगितले आहेत.

1. संसर्गावर (Infections) उत्तम उपाय - पांढऱ्या कांद्यामध्ये (White Onion) दाह कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे संसर्गातून बरं होण्यामध्ये पांढऱ्या कांद्याचा चांगला उपयोग होतो. “पांढऱ्या कांद्यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे डोळे, नाक आणि कानाच्या इन्फेक्शन्समधून (Eye, Nose and Ear Infection) बरं होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो, ” असं डॉ. रचना अग्रवाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.

2. पित्तावर म्हणजे अ‍ॅसिडिटीवर गुणकारी (Acidity) - ज्यामध्ये रिफाइन्ड कार्ब्ज असतात ते पदार्थ अत्यंत पित्तकारी असू शकतात. त्यामुळे आपल्याला लवकर संसर्ग होऊ शकतो; पण पांढऱ्या कांद्यात अल्कलाइन (alkaline) द्रव्य असतं. त्यामुळे जेव्हा अशा पित्तकारी पदार्थांबरोबर पांढरा कांदा खाल्ला जातो, तेव्हा पित्ताचं संतुलन साधलं जातं, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - Cumin Benefits : केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असते जिरे

3. श्वसनाच्या आजारांवर गुणकारी (Cures respiratory diseases) - दाह कमी करण्याच्या आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पांढरा कांदा जळजळ, सूज कमी करण्यात उपयुक्त आहे. पांढऱ्या कांद्याचा रस मधाबरोबर घेतल्यास खोकल्यावर एखाद्या कफ सिरपसारखा (Cough Syrup) तो अत्यंत गुणकारी ठरू शकतो. “पांढऱ्या कांद्याचा रस आणि मध तुम्ही फ्रीजमध्येही पाच तासांपर्यंत ठेवू शकता,”असंही डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं. “श्वसनाचा आजार असलेल्या व्यक्तीच्या छातीवर हा रस चोळल्यास आणि त्यावर एखादं सुती वस्त्र ठेवल्यास त्याचा फायदा होतो, असं आयुर्वेदात सांगितलं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

4. केसांच्या वाढीसाठीही पांढरा कांदा गुणकारी (Hair Growth) आहे. पांढऱ्या कांद्याचा रस टाळूवर (Scalp) लावल्यास त्यानं केसांची वाढ चांगली होते.

First published:

Tags: Food, Health, Lifestyle, Onion, Superfood