मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Laughing Benefits : गरोदरपणात हसल्याने बाळाला होतात 'हे' फायदे, आईही राहाते निरोगी

Laughing Benefits : गरोदरपणात हसल्याने बाळाला होतात 'हे' फायदे, आईही राहाते निरोगी

हसणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु गर्भधारणेदरम्यान ते अधिक महत्त्वाचे बनते. कारण गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहणे हे गरोदर स्त्रीलाच लाभत नाही तर जन्मलेल्या बाळाचे आरोग्य राखण्यासही मदत करते.

हसणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु गर्भधारणेदरम्यान ते अधिक महत्त्वाचे बनते. कारण गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहणे हे गरोदर स्त्रीलाच लाभत नाही तर जन्मलेल्या बाळाचे आरोग्य राखण्यासही मदत करते.

हसणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु गर्भधारणेदरम्यान ते अधिक महत्त्वाचे बनते. कारण गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहणे हे गरोदर स्त्रीलाच लाभत नाही तर जन्मलेल्या बाळाचे आरोग्य राखण्यासही मदत करते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : आजच्या युगात हसणं थोडं कठीण होत चाललंय. पण तरीही हसणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गर्भधारणेच्या टप्प्यातून जात असाल, तर तुमच्यासाठी हसणे आणि मनाने आनंदी राहणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहणे हे केवळ आईलाच लाभत नाही तर तिच्या बाळासाठीही खूप फायदेशीर आहे.

हसण्याने गरोदर स्त्रीचे आणि गर्भाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे गर्भवती महिलेला गर्भधारणेदरम्यान नेहमी हसण्यास आणि आनंदी राहण्यास सांगितले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगतो की, गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहणे याचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

Pregnancy Tips : प्रेग्नन्सीदरम्यान या त्रासांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच व्हा सावध

मानसिक ताण कमी होतो

गर्भवती महिलेला गरोदरपणात अनेक वेळा मूड स्विंगच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी कधी-कधी वाईट मूड आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर ताण येण्याची समस्या उद्भवते. हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. अशा स्थितीत गरोदर महिलेला हसणे खूप गरजेचे असते. यासाठी तुम्ही विनोद वाचू शकता आणि ऐकू शकता किंवा विनोदी चित्रपट पाहू शकता.

वेदना कमी होतात

गरोदरपणात अनेक वेळा गरोदर महिलेला पाठदुखी, डोकेदुखी, पाय दुखणे, अंगावर सूज येणे, थकवा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत जर तुम्ही लाफ्टर थेरपीची मदत घेतली तर तुमच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. कारण हसण्याने तुमच्या शरीरात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे तुमची अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.

बाळाचा योग्य विकास

गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहणे देखील महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आईचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच गर्भही अधिक सक्रिय राहतो. त्यामुळे बालकाचा विकास चांगला होऊन बालकाचा जन्म निरोगी होतो. एवढेच नाही तर आईच्या आनंदाचा परिणाम मुलांच्या मेंदूच्या पेशींवरही होतो. त्यामुळे गर्भातील बाळाच्या मेंदूचा विकासही चांगला होतो.

प्रतिकारशक्ती वाढवते

गरोदरपणात हसणे आणि आनंदी राहिल्याने केवळ आईचीच नाही तर बाळाचीही प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आई आणि बाळाला आजार होण्याचा धोका कमी होतो.

Post abortion care : गर्भपातानंतरचा 'तो' कठीण काळ; अबॉर्शननंतर काय काळजी घ्यायची

रक्तदाब योग्य राहातो

गरोदरपणात अनेक वेळा गर्भवती महिलेच्या रक्तदाबात चढ-उतार होतात. जे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे दोघांनाही अनेक समस्या येण्याचा धोका आहे. या काळात तुम्ही आनंदी राहिल्यास आणि हसत राहिल्यास तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy