अनेक आजारांसाठी खास स्वयंपाकघरातील औषधं

अनेक आजारांसाठी खास स्वयंपाकघरातील औषधं

लहान-सहान आजारांसाठी घरगुती उपाय केल्याने छू मंतर होतात. जर तुमच्या किचन गार्डनमध्येही काही महत्त्वाची औषधं असतील तर तुम्ही आजारापासून लांब रहाल. त्यामुळे ही काही खास घरगुती औषधं तुमच्या किचन गार्डनमध्ये नक्की लावा.

  • Share this:

11 डिसेंबर : आपल्या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे आपल्या आजीचा बटवा. लहान-सहान आजारांसाठी घरगुती उपाय केल्याने छू मंतर होतात. जर तुमच्या किचन गार्डनमध्येही काही महत्त्वाची औषधं असतील तर तुम्ही आजारापासून लांब रहाल. त्यामुळे ही काही खास घरगुती औषधं तुमच्या किचन गार्डनमध्ये नक्की लावा.

तुळस

तुळस आपल्या सगळ्यांच्याच दारात असते. ती सहज उपलब्ध होते. सर्दी-खोकल्यासारख्या आजारांवर तुळस उत्तम औषधी आहे.

मेहंदी

जर तुम्हाला खूप जास्त सर्दी असेल तर महेंदीची पानं पाण्यात उकळून प्या. त्याने सर्दीपासून तुम्हाला आराम मिळेल.

त्याचबरोबर कापलं किंवा भाजलं तर त्यावरही मेहंदीची पानं खूप फायदेशीर आहे.

धणे

धणे खूप गुणकारी औषधी आहेत. ते पोट आणि सर्दी-खोकल्यावर खूप उपयुक्त आहे.

लिंबू

लिंबाचं झाड बहुतेकांच्या दारात असतं. लिंबू आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. लिंबामुळे शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढते. लिंबू विटामिन सीचं मुख्य स्त्रोत आहे. लिंबाने पचनक्रिया चांगली होते.

ब्राह्मी

ब्राह्मी सहजरित्या उपलब्ध होणारी औषधी आहे. शरीरातल्या नसांसाठी ही औषधी अतिशय फायदेशीर आहे. ब्राह्मीने स्मरणशक्ती वाढायला मदत होते. पोटाचे विकार होत नाहीत.

कोरफड

कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफड त्वचा, पोट, केस आणि गुडघ्यावर अतिशय उपयुक्त आहे. कोरफडीचं पान आणि राईचं तेल पाण्यात उकळून प्या. त्याने अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

First published: December 11, 2017, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading