मुंबई, 31 जानेवारी : आपल्याकडे चहाप्रेमींची कमी नाही. अनेक लोकांना तर सकाळी उठल्यावर अगोदर चहा हवा असतो. त्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. मात्र चहा पिणे तितकेच फायदेशीर नसते. म्हणून बरेच लोक नेहमीच्या चहाऐवजी एखादा हेल्दी चहा पिणे पसंत करतात. जसे की, ब्लॅक टी, ग्रीन टी. मात्र तुम्ही कधी पिंक टी विषयी ऐकलं आहे का?
हा गुलाबी चहा म्हणजे काश्मिरी पिंक टी आहे. झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुलाबी चहा प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. जळजळ, आम्लपित्त आणि सूज येणे अशा पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात. हिवाळ्यात हा चहा तुमच्या शरीराला ऊब देतो. गुलाबी चहा हे काश्मीरचे प्रसिद्ध पेय आहे. या चहामध्ये लवंग, वेलची, बेकिंग सोडा आणि अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स वापरले जातात. त्यामुळे हा चहा तुम्हाला तणावापासूनही दूर ठेवतो.
मानेवरील चामखीळ आणि वाढत्या वजनाकडे करू नका दुर्लक्ष, असू शकते 'या' आजाराचे लक्षण
असा बनवा गुलाबी चहा...
गुलाबी चहा बनवण्यासाठी तुम्हाला 800 मिली पाणी, 1/2 टीस्पून लवंग, 3 वेलची, 300 मिली दूध, 1.5 चमचे साखर, 1 टीस्पून पिस्ता, 1 टीस्पून ग्रीन टी, 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा, 1 चक्रफुल, २ केशर, 2 बदाम, चिमूटभर गुलाबी रंग.
गुलाबी चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी घ्या. नंतर त्यात वेलची, लवंगा आणि ग्रीन टी हे सर्व घालून उकळा. यानंतर त्यात बेकिंग सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करा. व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करा. नंतर दुसऱ्या पॅनमध्ये दूध आणि साखर घाला.
हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. यानंतर एका कपमध्ये दूध टाका आणि नंतर त्यावर तयार केलेल्या चहापैकी अर्धा चहा टाका. नंतर त्यावर बर्फाचे तुकडे आणि पिस्ते टाका. आता तुमचा स्वादिष्ट गुलाबी चहा तयार आहे.
Diabetes Tips : शुगर लेव्हल होणार नाही High, फक्त रात्री झोपण्यापूर्वी करा या 6 गोष्टी
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tea