पगार कमी? चिंता नको, पाहा याचे फायदे

पगार कमी? चिंता नको, पाहा याचे फायदे

कमी पगार असलेल्या लोकांनीही निराश होऊ नये.कारण कमी पगार असलेल्या नोकरीचेही अनेक फायदे आहेत.

  • Share this:

29 जून : सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो.पण कमी पगार असलेल्या लोकांनीही निराश होऊ नये.कारण कमी पगार असलेल्या नोकरीचेही अनेक फायदे आहेत.चला यातलेच काही फायदे पाहू या.

1. पैशाचं मोल कळतं

एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळेच त्या गोष्टीचं महत्त्व कळतं. जेव्हा पगार कमी असतो तेव्हा कमीत कमी पगारात पूर्ण महिना काढावा लागतो. त्यामुळे पैशाची किंमत आपल्याला कळते .तसंच बचत करण्याची सवयही अंगवळणी पडते.

2. माणूस ओळखायला शिकवते

आज समाजात एखाद्याला महत्त्व त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळेच मिळतं. त्यामुळे पैसे नसताना, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही जे आपल्या मदतीस संकटाच्या वेळी धावून येतात तेच खरे मित्र असतात. म्हणून आपलं कोण परक कोण याची जाणीव होते.

3. सकारात्मकता रुजवते

कमी पैशात कमी खर्चात ही नोकरी जगायला शिकवते.सुखी रहायला शिकवते.जगण्यासाठी पैसे नाहीत तर आपले सकारात्मक विचार गरजेचे असतात ही शिकवण कमी पगाराची नोकरी देते आणि माणसात सकारात्मकता रूजवते.

4. प्रेरणा देते

कमी पगाराची नोकरी मिळाल्यावर माणूस चांगल्या पगाराची नोकरी शोधायला लागतो. कमी पगाराच्या नोकरीत माणसाला खूप काम करावं लागतं आणि पैसे मात्र कमी मिळतात. त्यामुळे जास्त पगाराच्या नोकरीसाठी आपल्याला किती काम करावं लागेल याची जाणीव होते. त्यादृष्टीने माणूस प्रयत्न करायला लागतो आणि अधिक मेहनत करतो.

या साऱ्या पलीकडे जाऊन आयुष्य घडवण्याच्या मार्गातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे कमी पगाराची नोकरी असते .

 

First published: June 29, 2017, 1:52 PM IST

ताज्या बातम्या