या आजारांवर द्राक्षे 'गोड'! जाणून घ्या फायदे

द्राक्षाने शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते. मुलांच्या वाढीसाठी द्राक्ष उत्तम फळ आहे. ताप, पचनशक्ती मंदावणे यावर द्राक्ष गुणाकारी आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2018 06:16 PM IST

या आजारांवर द्राक्षे 'गोड'! जाणून घ्या फायदे

25 जानेवारी : सध्या द्राक्षांचा सिझन आहे. द्राक्ष हे चविष्ट, पौष्टिक आणि पचण्यास सुलभ असे फळ आहे. द्राक्ष हे ग्लुकोजसाठी प्रसिद्ध फळ आहे. द्राक्षांच घड हे अन्नमूल्ये, खनिजं आणि जीवनसत्त्वांनी भरलेलं आहे. त्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत. अनेक मोठमोठ्या आजारांवर द्राक्ष गुणकारी आहे. पाहुयात द्राक्षाचे फायदे.

द्राक्षाने शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते. मुलांच्या वाढीसाठी द्राक्ष उत्तम फळ आहे. ताप, पचनशक्ती मंदावणे यावर द्राक्ष गुणाकारी आहे.

नशापानावरही द्राक्ष फायदेशीर आहेत. दारूची सवय सोडण्यासाठी द्राक्षाहाराचा उपयोग होतो. दारूच्या आठवणीने व्याकूळ होणाऱ्या रुग्णांना द्राक्षाचा रस द्यावा.

बद्धकोष्ठता - बध्दकोष्ठतेचा त्रास जाणवल्यास द्राक्ष खा. पोट साफ होण्यास मदत होईल. तंतुमय पदार्थ, साखर आणि सेंद्रिय आम्ल द्राक्षांमधील या घटकांमुळे द्राक्ष शरीरासाठी खुप पौष्टिक आहे.

दमा - दम्यावरील उपचारांमध्ये द्राक्ष खाल्लेली चांगली असतात. असं अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे. द्राक्षांच्या बागेत बऱ्याच काळ बसूनही दम्याच्या रोगाला लवकर आराम पडतो.

हृदयरोग - द्राक्ष हृदयाला बळकट बनवतात. हृदयरोगाचा झटका आला असल्यास द्राक्षे हृदयाची दुर्बलता कमी करून ठोके नियमित करतात. काही दिवस फक्त द्राक्षाचा रस पिल्यानेही हृदयरोगास फायदेशीर आहे.

डोकेदुखी - डोकेदुखीवर द्राक्षाचा रस एक उत्तम घरगुती औषध आहे.

मूत्रपिंडाच्या तक्रारी - द्राक्षांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते त्याचबरोबर पोटॅशियम क्षार असतात. द्राक्षांमध्ये मीठाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे मुतखडा, मूत्रपिंडाच्या तक्रारी, लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदनांवर द्राक्ष उपायकारक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2018 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close