मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits of Ginger : ही आल्याची कमाल! जगातील सर्वात HOT आजीने उलगडलं आपल्या स्लिम फिगरचं सिक्रेट

Benefits of Ginger : ही आल्याची कमाल! जगातील सर्वात HOT आजीने उलगडलं आपल्या स्लिम फिगरचं सिक्रेट

जगातील सर्वात हॉट आजीने (World Hottest Grand Mother) अखेर आपल्या तारुण्याचं सिक्रेट उलगडलं आहे.

जगातील सर्वात हॉट आजीने (World Hottest Grand Mother) अखेर आपल्या तारुण्याचं सिक्रेट उलगडलं आहे.

जगातील सर्वात हॉट आजीने (World Hottest Grand Mother) अखेर आपल्या तारुण्याचं सिक्रेट उलगडलं आहे.

  • Published by:  Priya Lad
कॅनबेरा, 24 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाच्या क्वीसलँडमध्ये राहणारी ही जिना स्विवर्ट (Gina Stewart) 51 वर्षांची आहे. पण तिचं सौंदर्य आणि फिगर पाहून ती अगदी तरुणच वाटते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जिना 4 मुलांची आई आहे आणि एका नातवाची आजी. जगातील सर्वात हॉट आजी (World Hottest Grand Mother) म्हणून ती ओळखली जाते. या वयातही ती इतकी सुंदर, तरुण कशी दिसते, असाच प्रश्न सर्वांना पडतो. अखेर तिने आपल्या सौंदर्याचा राज उलगडला आहे. या वयातही तरुण, स्लिम दिसण्याचं सिक्रेट आहे ते आलं. हो तेच आलं जे आपल्या स्वयंपाकघरात असतं. चहामध्ये जे आपण आवर्जून वापरतो आणि काही खाद्यपदार्थांमध्येही चवीसाठी म्हणून आपण टाकतो. हेच आलं जिनाच्या सौंदर्याचा आणि परफेक्ट फिगरचं सिक्रेट आहे. डेली स्टार रिपोर्टच्या मते, जिना दररोज आलं टाकलेलं गरम पाणी पिते. आल्यामध्ये वजन घटवण्याची आणि पचनप्रणाली वाढवण्याची शक्ती असल्याचे ती सांगते. हे वाचा - प्रेम आंधळं असतं पण इतकं? BF ला घटस्फोट मिळेना म्हणून GF ने त्याच्या बायकोसह... जिना सांगते, आल्यात antispasmodic आहे. ज्यामुळे शरीराला 60 प्रकारचे मिनरल्स आणि 30 अमिनो अॅसिड मिळततात. यामुळे घसा स्वच्छ होतो. मानसिक तणाव दूर होतो. शरीरातील अतिरिक्त लॅक्टिक अॅसिड लघवीमार्फत बाहेर पडतं. आल्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरिअल, अँटीपॅरासिटिक घटक असतात. पदार्थ किंवा पाण्यातून आलं घेतल्याचं स्ट्रेज मॅनेजमेंटमध्ये मदत मिळते. शरीरात बी-12 ची निर्मिती वाढते. हे वाचा - 37 वर्षांच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म हे आल्याचं ड्रिंक तिची कंबर, हिप आणि जांघांमधील फॅट कमी करतं. आल्याच्या सेवनासोबत हेल्दी फूड खाणं आणि नियमित एक्सरसाईझही महत्त्वाची असल्याचं ती सांगते.
First published:

Tags: Fitness, Health, Lifestyle, Woman

पुढील बातम्या