मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits of Ghee : बिनधास्त खा 'हे' तूप, अजिबात वाढणार नाही वजन

Benefits of Ghee : बिनधास्त खा 'हे' तूप, अजिबात वाढणार नाही वजन

Benefits of Ghee

Benefits of Ghee

आयुर्वेदात तूप हे औषधी असल्याचं म्हटलंय. अनेकदा जखमेवरही जुनं झालेलं तूप लावतात. तूप हे खूप गुणकारी आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 सप्टेंबर :  आहार हा सर्वसमावेशक हवा. पण अनेकजण काही पदार्थ खाणं टाळतात. डाएट करणारे अनेकजण संतुलित आहारावर भर देतात. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचं सेवन खूप कमी होतं. पण काही पदार्थ शरीरातील स्नायूंसाठी वंगण म्हणून काम करतात. तूप खाल्ल्याने हे शरीराला आवश्यक स्निग्ध पदार्थांचा पुरवठा होतो. अनेकदा आयुर्वेदिक डॉक्टरही तूप खाण्याचा सल्ला देतात. पण डाएट पाळणारे तूप खाणं टाळतात. तूप खाण्याने तुमचं वजन केवळ वाढतच नाही तर ते वजन कमीदेखील होतं. ऐकून धक्का बसला ना? पण तुपाने वजन नियंत्रणात कसं राहतं हे जाणून घेऊयात.

आयुर्वेदात तूप हे औषधी असल्याचं म्हटलंय. अनेकदा जखमेवरही जुनं झालेलं तूप लावतात. तूप हे खूप गुणकारी आहे. पण याबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. खरं तर, तूप खाल्ल्याने शरीरातली फॅट्स वाढत नाहीत. उलट ते कमी करण्याचं काम तुपामुळे होतं. यासाठीच जाणून घेऊयात गायीच्या आणि म्हशीच्या तूपात काय फरक आहे.

म्हशीच्या दूधापासून केलेल्या तूपाचे फायदे

1. म्हशीच्या दुधापासून केलेलं तूप हे वजन वाढवणर्‍यांसाठी उपयुक्त ठरतं. तब्येतीने बारीक, अशक्त असलेल्या लोकांना वजन वाढवण्यासाठी डॉक्टर तूप खाण्याचा सल्ला देतात.

2. म्हशीच्या दूधाचं तूप हे हाड मजबूत करतं. जर तुम्ही बॉडी-बिल्डिंग करत असाल तर हे तूप तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

3. अशक्तपणा, सतत थकवा वाटणं या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी हे तूप खावं. कारण पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारख्या शरीरोपयोगी खनिजांमुळे रक्तप्रवाह संतुलित राहतो. शरीरातील उर्जेचं प्रमाणही वाढतं.

हेही वाचा - Red Rice Benefits : कितीही भात खाल्ला तरी वाढणार नाही वजन; फक्त तुमचा तांदूळ बदला

गायीच्या दूधाच्या तूपाचे फायदे

1. गायीच्या दुधापासून केलेल्या तुपात व्हिटॅमिन्सचं प्रमाण खूप असतं. हे तूप खाल्ल्यामुळे व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि अँटिऑक्सिडंट्स यासारखे घटक शरीराला मिळतात.

2. गायीच्या दुधाचं तूप खाल्ल्याने अकाली म्हातारपण येत नाही. तसंच कॅन्सरपासूनही संरक्षण होतं. कारण यातील अँटिऑक्सिडंट्स फ्री-रॅडिक्ल्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवतं. फ्री-रॅडिकल्स हे शरीरातील अंतर्गत अवयवांना हानी पोहोचवतात.

3. तसंच हे तूप खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. शरीरात अतिरिक्त चरबी किंवा फॅट साचून राहत नाही.

गायीच्या आणि म्हशीच्या दूधपासून केलेल्या तुपातील फरक

1. गायीच्या दुधाचं तूप हे पिवळ्या रंगाचं असतं. म्हशीच्या दुधाचं तूप हे पांढरं असतं.

2. गायीच्या दुधाच्या तुपात फॅट्स नसतात, उलट म्हशीच्या दुधाच्या तुपात खूप फॅट्स असतात.

3. गायीच्या दुधापासून केलेल्या तुपात व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि मिनरल्स असतात. म्हशीच्या दुधापासून केलेल्या तुपात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आढळतं.

4. म्हशीच्या दुधाच्या तुपात पोषकद्रव्यांचे प्रमाण हे गायीच्या दुधापासून केलेल्या तूपापेक्षा तुलनेनं कमी असतात.

तूप खाणं हे शरीरासाठी उपयुक्त आहेच; पण प्रत्येकाच्या तब्येतीनुसार तुपाचं सेवन करावे. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तूप खाणं इष्ट राहील.

First published:

Tags: Lifestyle