लसणाचे शरीरासाठी आवश्यक असलेले हे गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत का?

लसणाचे शरीरासाठी आवश्यक असलेले हे गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत का?

मुळात लसणाचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात असल्याने जेवणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  • Share this:

लसूण आपल्या रोजच्या जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात हा पदार्थ सहजतेने सापडतो. मुळात लसणाचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात असल्याने जेवणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं असलं तरी लसणाची एक पाकळीही आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे हे तुम्हाला माहीत आहे का... आज आपण याच बहुपयोगी लसणाचे फायदे जाणून घेऊ...

- दातदुखीवर लसूण प्रभावी ठरतं. त्याच्या एका पाकळीत दातदुखी कमी होऊ शकते. यातील अँटी बॅक्टेरीअल गुणामुळे दुखणं कमी होतं. लसणाची पाकळी ठेचून दुखऱ्या दाताखाली ठेवावी. त्याने वेदना कमी होतात.

- रोज एक पाकळी लसूण खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं. उच्च हाय ब्लडप्रेशरचा त्रास कमी होतो.तसंच ह्रदयाशी संबंधित आजारही कमी होतात. तसंच कोलेस्ट्रॉल लेव्हलही मर्यादित राहते.

- लसणामुळे पचनक्रिया सुधारते. तसच लसूण पोटातील टॉक्सीन साफ करतं. पोटाच्या काना-कोपऱ्यातील घाण विष्ठेद्वारे निघून जाते.

- अंगावरील खाज किंवा लहान किड्यांच्या चावण्यावर उपाय म्हणून लसणाचा उपयोग होतो. लसूण अंगावरील खाज कमी करतं.

- जर तुमच्या त्वचेवर काही इन्फेक्शन झालं असेल तर लसूण ठेचून त्या जागेवर लावावं. थोड्या वेळात पाण्याने धुवून टाकावं.

- लसणात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर औषधात केला जातो. सर्दी-खोकल्यावरील औषधांमध्ये लसणाचा वापर केलेला असतो.

- लसणात कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असते आणि त्यात व्हिटामिन सी आणि व्हिटामिन बीचं प्रमाण जास्त असतं. इतकच नव्हे तर त्यात असलेला एक-एक घटक आपल्या शरीराला उपयुक्त असतो.

- लसूण आणि कांद्याच्या सेवनाने शारीरिक क्षमता वाढते. शरीराला आराम पडतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

मोबाइल पाहता- पाहता रेल्वे रुळांवर पडली महिला, समोर आली ट्रेन, पाहा Viral Video

VIDEO: जेव्हा कावळ्याने केला चिमणीच्या बाळावर हल्ला, तेव्हा झालं असं काही...

नदीत तरंगणार हॉटेल होतंय तयार, 2020 च्या बुकिंगलाही झाली सुरुवात

फेवरेट पदार्थ खाऊनही आता वाढणार नाही तुमचं वजन, ही आहेत कारण

वडिलांचं नाव 'मध्यप्रदेश', मुलाचं नाव 'भोपाळ'.. अनोखी आहे नाव ठेवण्याची ही पद्धत

Published by: Madhura Nerurkar
First published: November 3, 2019, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading