मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लसूण आणि मधाचं कॉम्बिनेशन वजन घटवण्यासाठी आहे बेस्ट उपाय; असं रोज सकाळी वापरा

लसूण आणि मधाचं कॉम्बिनेशन वजन घटवण्यासाठी आहे बेस्ट उपाय; असं रोज सकाळी वापरा

Netmeds मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, लसूण हे डिटॉक्स आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे. लसणातील अँटिऑक्सिडंट अॅलिसिन यकृतातील एन्झाईम्सला उत्तेजित करतात, ज्यामुळे हानिकारक पदार्थ बाहेर टाकणं सोपं होतं.

Netmeds मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, लसूण हे डिटॉक्स आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे. लसणातील अँटिऑक्सिडंट अॅलिसिन यकृतातील एन्झाईम्सला उत्तेजित करतात, ज्यामुळे हानिकारक पदार्थ बाहेर टाकणं सोपं होतं.

मध आणि कच्चा लसूण यांचे मिश्रण काही दिवस नियमित घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. वजन कमी करण्यासाठी हा सुरक्षित आणि आरोग्यदायी घरगुती उपाय आहे.

नवी दिल्ली, 12 मे : वजन कमी करण्याचे अनेक उपाय आहेत, त्यापैकी एक म्हणजे मध आणि कच्चा लसूण एकत्र खाणे. लसूण आणि मध यांचे मिश्रण वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सहसा, वजन कमी करणं सोपं काम नाही, यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. ज्यांचे वजन जास्त आहे, ते वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. यासाठी काही लोक सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पितात, तर काही डायटिंग करत राहतात. काही लोक जेवण कमी करतात, त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत मध आणि कच्चा लसूण यांचे मिश्रण काही दिवस नियमित घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. वजन कमी करण्यासाठी हा सुरक्षित आणि आरोग्यदायी घरगुती उपाय आहे. बरेचदा लोक सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खातात, त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला डिटॉक्सिफाय करता येते. एवढेच नाही तर उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाचे आरोग्यदायी फायदे देखील (Garlic and Honey for Weight Loss) आहेत.

लसूण आणि मध खाण्याचे फायदे -

food.ndtv.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. कोणी कफ आणि फ्लूच्या समस्येने त्रस्त असाल तर लसूण आणि मधाचे सेवन केल्याने आराम मिळेल. याशिवाय हे मिश्रण पचनसंस्था निरोगी ठेवते, शरीराला डिटॉक्स करते.

वजन कमी करण्यासाठी लसूण आणि मधाचे फायदे

हे मिश्रण शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. या अन्न संयोजनाचा सर्वात मोठा आरोग्य लाभ हा आहे की ते भूक उत्तेजित करते आणि पचन सुधारून वजन कमी करण्यास मदत करते. तुमची पचनक्रिया चांगली असेल तर वजनही झपाट्याने कमी होईल. वजन कमी करण्यासाठी मध आणि लसूण हा एक उत्तम घरगुती उपाय आहेत. कच्च्या लसणात शिजवलेल्या लसणापेक्षा जास्त पोषक घटक असतात. यामुळे कच्च्या लसणात वजन कमी करण्याचे उत्तम घटक आढळतात. सकाळी रिकाम्या पोटी मध खाल्ल्यास चरबीचे अधिक चांगले चयापचय करण्यास मदत होते. मधामध्ये फॅट आणि कोलेस्टेरॉल नसते. याच्या सेवनामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. मध चांगल्या उर्जेचा स्त्रोत देखील आहे, सकाळची सर्व कामे सहजतेने पार पाडण्यास मदत होते.

हे वाचा - प्रवासात उलटीचा त्रास होईलच कसा? या 3 गोष्टी तुमचं टेन्शन घालवतील

वजन कमी करण्यासाठी मध-लसूण कसा खायचा -

लसणाच्या काही पाकळ्या घ्या, त्यांची साले काढून टाका. सेंद्रिय किंवा कच्चा मध घ्या. लसूण एका भांड्यात ठेवा आणि वर मध घाला. लसूण पूर्णपणे मधात बुडवू द्या. बरणी घट्ट बंद ठेवा. त्यामध्ये असलेले पोषक घटक एकमेकांमध्ये मिसळतील. यापैकी दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक लसूण खा. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. लक्षात ठेवा एका दिवसात एकापेक्षा जास्त लसूण खाऊ नका नाहीतर मध-लसूण एकत्र केल्याने काही लोकांमध्ये दुष्परिणाम होऊ शकतात. या दुष्परिणामांमध्ये रक्त पातळ होणे, चक्कर येणे, उलट्या होणे, जास्त घाम येणे, अशक्तपणा जाणवणे, त्वचेची ऍलर्जी, अनियमित हृदयाचे ठोके इत्यादी त्रासही होऊ शकतात.

हे वाचा - टेन्शन नॉट! आता आंबे खरेदी करताना होणार नाही फसवणूक; या 2 गोष्टी ध्यानात ठेवा

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss