मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Exercise In Evening: सकाळी-सकाळी नव्हे संध्याकाळी करा व्यायाम; सगळे फायदे वाचून तुम्हीही नियोजन बदलाल

Exercise In Evening: सकाळी-सकाळी नव्हे संध्याकाळी करा व्यायाम; सगळे फायदे वाचून तुम्हीही नियोजन बदलाल

Benefits Of Exercise In Evening : तज्ञांचे मत आहे की संध्याकाळी व्यायाम केल्यास (Exercise In Evening) आरोग्यास अनेक प्रकारे फायदा होतो. त्यामुळे सकाळी वेळ मिळत नाही, म्हणून नाराज होण्याची गरज नाही. सकाळी कामात अडकणारे संध्याकाळी व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतात

पुढे वाचा ...

 मुंबई, 07 जानेवारी : व्यायामाची (Exercise ) योग्य वेळ सकाळची असते, असे आपण अनेकदा ऐकले आहे. पण ज्यांना सकाळच्या कामाच्या गडबडीत व्यायाम, योगा किंवा चालणे शक्य होत नाही त्यांचे काय? अशा स्थितीत, तज्ञांचे मत आहे की संध्याकाळी व्यायाम केल्यास (Exercise In Evening) आरोग्यास अनेक प्रकारे फायदा होतो. त्यामुळे सकाळी वेळ मिळत नाही, म्हणून नाराज होण्याची गरज नाही. सकाळी कामात अडकणारे संध्याकाळी व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतात आणि त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. HealthifyMe दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहतेच तसेच विविध प्रकारे तणाव आणि मानसिक समस्याही कमी होतात. आज आपण संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे (Benefits Of Exercise In Evening) जाणून घेऊया.

संध्याकाळी व्यायामाचे फायदे

1. वॉर्मअपची गरज नाही

सकाळी व्यायाम करायचा असेल तर आधी शरीराला उबदार (वॉर्मअप) करावे लागते. सकाळी वॉर्म अप न करता व्यायाम किंवा जॉगिंग केले तर तुमचे सांधे आणि स्नायू ब्रिज होऊ शकतात. तर संध्याकाळच्या वेळी शरीर आधीच वेगवेगळ्या कामांनी तापलेले असते. त्यामुळे स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता कमी असते.

2. तणाव

तुम्हाला दिवसभराचा ताण दूर करायचा असेल, तर तुमच्या जीवनशैलीत संध्याकाळी व्यायामाचे नियोजन करा. संध्याकाळी व्यायाम केल्याने केवळ तणाव कमी होत नाही तर व्यक्तीची मानसिक स्थितीही निरोगी राहते, ज्यामुळे तणाव दूर होण्यासोबतच मानसिक आराम मिळतो.

हे वाचा - Healthy Life: व्यायाम करण्याचा येतोय खूप कंटाळा? मग या 5 गोष्टी करून दिवसभर रहाल फिट

3. चांगली झोप

संध्याकाळी व्यायाम केल्याने रात्री चांगली झोप लागते. आजच्या काळात बहुतेक लोक निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा स्थितीत संध्याकाळी नियमित व्यायाम केल्यास झोप न येण्याची समस्या तर दूर होतेच, पण दुसऱ्या दिवशी व्यक्तीला फ्रेशही वाटू शकते.

4. मानसिक आरोग्यासाठी उत्तम

एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन असेल किंवा चिंताग्रस्त असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही संध्याकाळी व्यायाम करावा. संध्याकाळी व्यायाम केल्यास रक्ताभिसरण सुधारू शकते. अशा वेळी व्यायाम करून मानसिक स्वास्थ्य चांगले राखता येईल.

हे वाचा - Sexual Health : नवीन-नवीनच लग्न झालं असेल तर चुकूनही या 5 गोष्टी खाऊ नका; पश्चातापाची वेळ येईल

5. भरपूर वेळ मिळतो

कॉलेज आणि ऑफिसच्या वेळेत जाण्यासाठी सकाळी लवकर व्यायाम करण्यासाठी जीम, व्यायामशाळांमध्ये गर्दी असते. पण, जेव्हा तुम्ही दिवसभर सगळी कामं उरकून संध्याकाळी व्यायामाला जाता तेव्हा तुमच्याकडे स्वतःसाठी भरपूर वेळ असतो. अशा प्रकारे तुम्ही व्यायामाचा अधिक आनंद घेऊ शकता.

First published:

Tags: Health Tips, Types of exercise