मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits Of Murabba: आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे मुरंबा; जाणून घ्या त्याचे विविध प्रकार आणि गुणधर्म

Benefits Of Murabba: आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे मुरंबा; जाणून घ्या त्याचे विविध प्रकार आणि गुणधर्म

Marmalade Benefits: आवळ्याबरोबरच आंबा (Mango), सफरचंद (Apple), गाजर आणि द्राक्षांचा मुरंबा देखील तयार केला जातो. विविध प्रकारच्या मुरंब्याचा उपयोग आजारांना दूर ठेवण्यासाठी होतो.

Marmalade Benefits: आवळ्याबरोबरच आंबा (Mango), सफरचंद (Apple), गाजर आणि द्राक्षांचा मुरंबा देखील तयार केला जातो. विविध प्रकारच्या मुरंब्याचा उपयोग आजारांना दूर ठेवण्यासाठी होतो.

Marmalade Benefits: आवळ्याबरोबरच आंबा (Mango), सफरचंद (Apple), गाजर आणि द्राक्षांचा मुरंबा देखील तयार केला जातो. विविध प्रकारच्या मुरंब्याचा उपयोग आजारांना दूर ठेवण्यासाठी होतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 डिसेंबर : मुरंबा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर (Murabba Benefits) आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अनेकवेळा आवळा जाम खाल्ला असेल. मुरंबा केवळ पोटाच्‍या समस्या दूर करत नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्‍यातही मदत करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुरंबा हा फक्त आवळ्यापासून बनवला जात नाही तर इतर अनेक गोष्टींनी बनवला जातो. आज आपण मुरंब्याच्या विविध प्रकारांविषयी जाणून घेऊया जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Marmalade Or Murabba Benefits) आहेत.

आवळ्याबरोबरच आंबा (Mango), सफरचंद (Apple), गाजर आणि द्राक्षांचा मुरंबा देखील तयार केला जातो. हेल्थ बॉक्स वेबसाइटच्या माहितीनुसार, विविध प्रकारच्या मुरंब्याचा उपयोग केवळ रोगापासून बचाव करण्यासाठी नाहीतर रोगांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे सेवन फायदेशीर ठरते. जाणून घेऊया मुरंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

आंब्याच्या मुरंब्याचे फायदे

आंब्याचा मुरंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि लोह यांसारखे बरेच घटक असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर बॅक्टेरियाचे संक्रमण आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांमध्येही सहज आराम मिळतो. आंब्याचा मुरंबा खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होऊ लागते.

बेल मुरंब्याचे फायदे

बेल मुरंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचाही समावेश असतो. म्हणूनच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बेल मुरंबा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण पचनसंस्थाही निरोगी राहते. ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. एवढेच नाही तर बेल मुरब्बा खाल्ल्याने मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी होण्यास मदत होते.

हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर

गाजर मुरंब्याचे फायदे

गाजराचा मुरंबा अनेकदृष्या फायदेशीर आहे. तो खाल्ल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. यामध्ये व्हिटॅमिन ए देखील असते जे दृष्टी वाढवण्यास मदत करते. यासोबतच या मुरंब्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करते. गाजराचा मुरंबा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही योग्य ठेवतो. यासोबतच पोटाची जळजळ, भूक न लागणे या समस्याही हा मुरंबा खाल्ल्याने दूर होतात.

सफरचंद मुरंबा

फक्त सफरचंद नाही तर सफरचंद मुरब्बा देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर सारख्या घटकांचा समावेश असतो. त्याचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासोबतच अशक्तपणा आणि मानसिक तणावही दूर होतो. सफरचंदाचा मुरंबा देखील निद्रानाश, डोकेदुखी आणि विस्मरण दूर करते. यासोबतच सफरचंदाचा मुरंबा केस गळती आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यातही मदत करतो. सफरचंदाचा मुरंबा खाल्ल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहते आणि पचनक्रियाही चांगली राहते.

हे वाचा - Cancer: भारतीय आहार पद्धती कॅन्सरवर आहे फायदेशीर, हा मसाला आहे सर्वात प्रभावी

आवळा मुरंबा

आवळा मुरंब्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आवळ्याच्या मुरंब्यामध्ये जीवनसत्त्वे, क्रोमियम, जस्त आणि तांबे चांगल्या प्रमाणात असतात. आवळा मुरंबा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासोबत आवळा जाम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पचनक्रिया सुधारते. आवळा मुरंबा त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यातही खूप मदत करतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरुमांच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle