मुंबई, 18 जानेवारी : तुम्ही अनेकदा घरातील इतर लोकांचे म्हणणे ऐकले असेल की जर तुम्हाला तुमचा मेंदू तीक्ष्ण करायचा असेल तर रोज बदाम खा. बदाम हे एक असे ड्रायफ्रूट आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. बदामाचे सेवन अनेक प्रकारे करता येते. काही लोक ते कोरडे खातात तर काहीजण पाण्यात भिजवून खातात. पण तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही पाण्याऐवजी मधात भिजवलेले बदाम खाल्ले तर ते आणखी फायदेशीर ठरू शकते.
मध आणि बदाम दोन्ही सुपर फूडमध्ये गणले जातात. या दोन्हींचे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. मधाला आयुर्वेदात अमृतसारखे मानले जाते कारण त्यात अनेक अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे बदामाचे फायदे वाढवतात. चला जाणून घेऊया मधात भिजवलेले बदाम खाण्याचे काय फायदे आहेत...
Food Combination : पालक पनीर खरंच आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? मोठा गैरसमज होईल दूर
एनर्जी वाढवते : जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मधात भिजवलेले बदाम खाल्ले तर त्यामुळे तुमची एनर्जी वाढते. तुम्ही दिवसभर उर्जेने भरलेले राहता. तुम्ही नाश्त्यातही याचा समावेश करू शकता. जर तुम्हाला लवकरच थकवा आणि डोकेदुखी जाणवत असेल. तर तुम्ही नक्की हे पदार्थ खा.
पचनक्रिया सुधारते : बदाम मधासोबत खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यामध्ये असलेले फायबर शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर : बदाम आणि मध यांचे मिश्रण आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई त्वचेला चमक देतात आणि केस मजबूत करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
मेंदू तीक्ष्ण करते : मध आणि बदामामध्ये आढळणारे ओमेगा -3 6 फॅटी ऍसिड आपल्या मेंदूला तीक्ष्ण करतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स आपल्या मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर : बदाम आणि मधाचे सेवन केल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण मिळते. यासोबतच प्रतिकारशक्तीही मजबूत करते.
दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढतं का? नेमकी माहिती जाणून घ्या
हृदय निरोगी ठेवते : बदामामध्ये असलेले तत्व कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासही मदत करते. त्यामुळे जर तुमची कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असेल तर त्याचे रोज सेवन करा. यासोबतच बदाम मधासोबत खाल्ल्याने हृदय निरोगी राहते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle