नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : चविष्ट आणि मसालेदार खाद्य पदार्थ हिरव्या मिरच्याशिवाय (green chillie) बनवता येणं अवघड आहे. विशेष म्हणजे हिरवी मिरची जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही ती खूप फायदेशीर असते. आपण पाहतो की लोक अनेकदा हिरवी मिरची खाणं टाळतात, परंतु आपल्याला माहीत आहे की ती अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. मिरची वजन कमी करण्यापासून रक्ताभिसरणाला गती देण्यापर्यंत उपयुक्त आहे, असे आरोग्य (Health Benefits of green chillie) तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हिरव्या मिरचीचे आश्चर्यकारक फायदे
हिरव्या मिरचीमध्ये असे अनेक घटक आढळतात, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी, लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. इतकेच नाही तर बीटा कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन-झेक्सॅन्थिन इत्यादी आरोग्यदायी गोष्टी आहेत.
सायनस आणि दमा उपचार
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ताज्या मिरचीच्या रसात एक चमचा मध मिसळून तो रिकाम्या पोटी खाल्ल्यास दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो. याशिवाय हिरव्या मिरच्या खाल्ल्याने उष्णता बाहेर पडते, वेदना कमी होतात. त्यात कॅप्सेसिन असते, जे नाकात रक्त प्रवाह सुलभ करते. यामुळे सर्दी आणि सायनसच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. थंडीच्या काळात याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
हिरव्या मिरचीचे आश्चर्यकारक फायदे
रक्त परिसंचरण गतिमान करते
आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे घटक असते, ज्यामुळे ते मसालेदार बनते. मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि नसांमध्ये रक्तप्रवाह जलद होतो, त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्याही दूर होते.
हे वाचा - टॉयलेट सीटवर 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसत असाल तर हे वाचा.. सवय आरोग्यासाठी धोकादायक!
प्रतिकारशक्ती वाढवते
कोरोनाच्या काळात हिरवी मिरची खाण्यावर भर दिला जात आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन केले जाऊ शकते. हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराला बॅक्टेरियापासून मुक्त ठेवण्यास मदत करतात. हिरवी मिरची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करू शकते.
मूड चांगला राहतो
हिरवी मिरची मूड बूस्टर म्हणूनही काम करते. हे मेंदूमध्ये एंडोर्फिन प्रसारित करते, ज्यामुळे आपला मूड बर्याच अंशी आनंददायी राहतो.
डोळ्यांसाठी फायदेशीर
डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए आढळून येते, ज्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते.
वजन कमी होते
हिरवी मिरची वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असण्याव्यतिरिक्त, त्यात कॅलरीज नसतात. हिरवी मिरची देखील चयापचयासाठी चांगली मानली जाते.
चेहरा उजळतो
हिरव्या मिरच्या चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Winter session