Home /News /lifestyle /

Periods मध्ये बिनधास्त खा दही; नुकसान नाहीच पण फायदे मात्र आहेत बरेच

Periods मध्ये बिनधास्त खा दही; नुकसान नाहीच पण फायदे मात्र आहेत बरेच

मासिक पाळीच्या कालावधीत दह्यासारखे आंबट पदार्थ खाऊ नये, असं सांगितलं जातं. पण खरंतर दही आवर्जून खायला हवं.

मुंबई, 25 जून : दूध (Milk), दही (Curd), ताक (Butter Milk) हे कॅल्शियमचे (Calcium) चांगले स्रोत मानले जातात. विशेषतः स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता अधिक प्रमाणात असते. त्यामुळे आहारात दूधाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकांना दूध आवडत नाही अशावेळी ताक, दही (Benefits of curd) या दुग्धजन्य पदार्थांच सेवन फायदेशीर ठरतं. पण याबाबतही काही गैरसमज आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महिलांनी मासिक पाळीच्या (Periods) काळात दही खाऊ नये त्यामुळे वेदना वाढतात असं मानलं जातं. आपल्या देशात मासिक पाळीबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. या काळात स्त्रियांवर अनेक निर्बंध असतात. अनेक ठिकाणी आजही पूर्वापार चालत आलेल्या अनेक प्रथा पाळल्या जातात. यामध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी देवाला शिवू नये, पलंगावर झोपू नये, घराबाहेर जाऊ नये यासह अमुक गोष्टी खाऊ नयेत. अशा अनेक बाबींचा समावेश आहे. त्यापैकीच एक आंबट पदार्थ न खाणे. हे वाचा - एक चिमूट केशर, पुरुषांसाठी ठरू शकतं खूप उपयुक्त; कसं घ्यायचं, कधी खायचं? मासिक पाळीच्या काळात दही (Curd) किंवा कोणतेही आंबट पदार्थ खाल्ल्या तर वेदना वाढतात असा समज आहे.  पण याबाबतीत आहार तज्ज्ञांचं म्हणणं मात्र एकदम विरुद्ध आहे. मासिक पाळीच्या कालावधी दही खाल्ल्याने बरेच फायदे होतात. मासिक पाळीत दही खाण्याचे काय आहेत फायदे? तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या काळात महिलांनी ताजं दही (Fresh Curd) खाल्ल्यास वेदना होणं, पेटके येणं हे त्रास कमी होण्यास मदत होते. मासिक पाळीच्या काळात शरीरातील पाण्याची पातळी योग्य असणं अत्यंत आवश्यक असतं. दही खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळीही योग्य राहण्यास तसंच पोषणमूल्य वाढण्यास मदत होते. दही हे प्रोबियोटिक (Probiotic) गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीला ते मदत करते. याशिवाय दह्यामध्ये फॅटस, प्रथिनं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. दह्यातील कॅल्शियम मूड स्विंग्ज, नैराश्य आणि चिडचिडेपणा दूर ठेवण्यास मदत करतं. कॅल्शियममुळे शरीरातील हाडांची मजबुती वाढते. दह्यात असलेल्या चांगल्या जीवाणूंमुळे सूज, जळजळ कमी होणं, अपचनाच्या तक्रारी दूर होण्यासही मदत होते. हे वाचा - चिंता नको! आता आलं आयुर्वेदिक चॉकलेट; मुलांना बिनधास्त खाऊ द्या त्यामुळे महिलांनी नियमितपणे दूध, दही ताक यांचं सेवन करणं गरजेचं असून, मासिक पाळीच्या काळात दही, ताक, लस्सी, स्मूदी यांचं सेवन करणं लाभदायीच ठरतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Periods, Superfood, Woman

पुढील बातम्या