बिनधास्त खा! तुपाचं खाणार... त्याचं वजन कमी होणार

बिनधास्त खा! तुपाचं खाणार... त्याचं वजन कमी होणार

वजन वाढू नये म्हणून तूप (ghee) खाणं टाळत असाल तर त्याचा काहीही फायदा नाही.

  • Last Updated: Nov 20, 2020 04:38 PM IST
  • Share this:

तूप (ghee) जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरलं जातं. बरेच लोक तूप टाळतात कारण तूप खाल्ल्यानं वजन वाढण्याची भीती असते. मात्र गायीचं तूप खाल्ल्यानं कधीही वजन वाढत नाही उलट वजन कमी होतं. गायीच्या तूपात जीवनसत्त्व ए, डी, के, कॅल्शियम, फॉस्फरस, खनिजे, पोटॅशियम यासारखे बरेच पौष्टिक घटक असतात आणि इतकंच नाही तर गायीचं तूप अनेक अँटिऑक्सिडंट घटकांनीही समृद्ध आहे. तसंच ओमेगा -3 आणि ओमेगा -9 सारखे फॅटी अॅसिड्स देखील यात आढळतात. वजन कमी करण्याशिवाय गायीच्या तुपाचे असे अनेक फायदे आहेत.

डोकेदुखी आणि मायग्रेनमध्ये फायदेशीर

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्यांमध्ये गायीचं तूप खूप फायदेशीर आहे. जर आपण सकाळी आणि संध्याकाळी खाण्याआधी गायीच्या तुपाचे दोन थेंब आपल्या नाकात अर्धा तास टाकून ठेवले तर मायग्रेनपासून लवकरच मुक्तता होईल. याच्या नियमित सेवनानं डोकेदुखी, केसगळती आणि डोळ्यांचा त्रासही कमी होईल.

शरीराची दुर्बलता दूर करण्यात उपयुक्त

शरीरात कमकुवतपणाची तक्रार असल्यास गायीचं तूप यासाठीदेखील फायदेशीर आहे. एक ग्लास दुधात अर्धा चमचा तूप आणि मध मिसळा.  नियमितपणे घेतल्याने शरीरास थकवा जाणवणार नाही.

सांधेदुखीच्या समस्येपासून मुक्तता

गायीचं तूप सांधेदुखीसाठी एक उत्तम औषध मानलं जातं. जर संधिवात असलेल्या रुग्णाने दररोज गायीच्या तुपानं सांध्याकाळी मालिश केली तर वेदनांची समस्या दूर होईल. ज्यांना सांधेदुखीची समस्या सतत होत असते त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. याव्यतिरिक्त तुपानं मालिश केल्यानं हाडंही मजबूत होतात.

गायीचं तूप कफ काढून टाकतं

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, गायीच्या तुपात थोडं मीठ घालून ते हलकं गरम करा. आता यास छातीवर मालिश करा. यानं कफ वितळेल आणि बाहेर येईल. मुलांमधील कफच्या समस्येवर हे प्रभावी औषध आहे.

गायीचं तूप रोग प्रतिकारशक्ती वाढवतं

गायीच्या तुपात सर्व जीवनसत्त्वं आणि अँटी-ऑक्सिडंट घटकांमुळे त्याचं सेवन केल्यानं शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे शरीराला कोणत्याही रोगाविरूद्ध लढायला मदत होते.

शरीरास उत्स्फुर्तता देण्यास उपयुक्त

शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी गायीचं तूप हे आयुर्वेदिक औषध मानलं जातं. गायीच्या तुपात सर्व प्रकारचे फॅटी अॅसिड्ससह सर्व जीवनसत्त्वं शरीरास ऊर्जा प्रदान करतात.

गायीचं तूप कर्करोगापासून संरक्षण करतं

गायीचं तूप अँटी-ऑक्सिडंट घटकांनी समृद्ध असतं जे शरीरातून विषारी घटक बाहेर काढून टाकतात. गायीचं तूप कोणत्याही प्रकारचे कर्करोग रोखण्यास मदत करतं. गायीचं तूप नियमितपणे आहारात वापरावं. यामुळे शरीर निरोगी राहिल. याशिवाय ज्या लोकांना कोलेस्टेरॉलची समस्या जास्त आहे त्यांनीही नियमितपणे गायीचे तूप खावं. हे पचनदेखील सुधारतं आणि रक्तदाब संतुलित करतं.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - लवकर वजन कमी करायचे घरगुती उपाय...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 20, 2020, 4:38 PM IST

ताज्या बातम्या