..म्हणून प्लॅस्टिकच्या बाटलीपेक्षा नेहमी काचेच्या बाटलीत पाणी प्यावं

..म्हणून प्लॅस्टिकच्या बाटलीपेक्षा नेहमी काचेच्या बाटलीत पाणी प्यावं

प्लॅस्टिकपेक्षा काचेच्या बाटलीतू पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

  • Share this:

ऑफिसमध्ये प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळी पिण्याच्या पाण्याची बाटली असते. सध्या नावाजलेल्या ब्रँडच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जातात. पण काहीजण काचेच्या आणि तांब्याची बाटली वापरण्याला प्राधान्य देतात. फार कमी लोकांना माहीत आहे की, काचेच्या बाटलीत पाणी पीणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. प्लॅस्टिकपेक्षा काचेच्या बाटलीतू पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

काचेच्या बाटलीत फिल्टर करून ठेवलेलं पाणी जास्त स्वच्छ आणि ताजं असतं. यात कोणत्याही प्रकारचा रासायनिक बदल होत नाही. याशिवाय काचेची बाटली साफ करणंही सहज शक्य असतं. तसंच काचेच्या बाटलीची चमक कधीही जात नाही. वर्षांनू वर्ष ही चमक तशीच राहते.

उन्हाळ्याच्या दिवसांत याच बाटल्या फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. थंड पाणी शरीरासाठी चांगलं नसतं हे तर साऱ्यांनाच माहीत आहे पण तरीही उन्हाळ्यात थंड पाणी पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण जर तुम्ही काचेच्या बाटलीत फिल्टर केलेलं पाणी ठेवत असाल तर आठवड्याभरानंतरही त्यातलं पाणी तेवढंच शुद्ध चांगलं असेल. यात कोणत्याही प्रकारचं बीपीए किंवा रासायनिक बदल होत नाहीत.

याशिवाय काचेच्या बाटलीत जर तुम्ही लिंबू, संत्र किंवा कोणतही फळ टाकलं असेल तर आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. याउलट प्लॅस्टिकच्या बाटलीत या गोष्टी खराब होतात आणि ठराविक काळानंतर त्यांचा रंगही बदलून जातो.

Reasearch- प्रत्येक वयातील महिलांनी खाल्ली पाहिजेत ही 5 फळं, कारण...

PV Sindhuचा फिटनेस फंडा पाहून व्हाल अवाक्; म्हणाल, कोण करतं एवढं कठीण डाएट

सेक्सच्या आधी आणि नंतर या पाच गोष्टी कधीही विसरू नका

आपल्या पार्टनरशी नेहमी हे खोटं बोलतात मुलं, पण कधीही मान्य करत नाहीत

VIDEO: ...आणि त्याने राहुल गांधींच्या गालावर KISS केलं

Published by: Madhura Nerurkar
First published: August 28, 2019, 3:52 PM IST

ताज्या बातम्या