तुमच्यासाठी फायदेशीर आहे धनुरासन, जाणून घ्या आसन करण्याची योग्य पद्धत

तुमच्यासाठी फायदेशीर आहे धनुरासन, जाणून घ्या आसन करण्याची योग्य पद्धत

धनुरासनचं वैशिष्ट्य म्हणजे हे आसन केल्यानंतर भुसंगासन आणि शलभासन या दोन्ही आसनांचा फायदा मिळतो.

  • Share this:

या आसनला धनुरासन याचसाठी म्हटलं जातं की, हे धनुष्यच्या आकारात होतं. हे आसन पद्मासन श्रेणीतील एक आसन आहे. धनुरासनचं वैशिष्ट्य म्हणजे हे आसन केल्यानंतर भुसंगासन आणि शलभासन या दोन्ही आसनांचा फायदा मिळतो. धनुरासनामुळे पाठीचा कणा आणि हाडं मजबूत होतात. एवढंच नाही तर हे आसन केल्याने पोटाशी संबंधित सर्व विकार दूर होतात.

धनुरासन करण्याची पद्धत-

धनुरासन करण्यासाठी सर्वातआधी पोटावर झोपा. पाय आणि हातांमध्ये अंतर ठेवा. गुडघ्याला मोडून कमरेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा आणि पाय दोन्ही हातांनी उलटे पकडा. आता श्वास घेत छातीला जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. आता पाय पुढच्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करा. याचवेळी आपला तोल सांभाळत समोर पाहण्याचा प्रयत्न करा. हे आसन तुमच्या क्षमतेनुसार करा. 15 ते 20 सेकंदांनंतर श्वास सोडत छाती आणि पाय हळूहळू जमिनीवर आणा.

धनुरासनचे फायदे-

धनुरासन केल्याने वजन कमी होतं.

मासिक पाळीत नियमितता येते.

छाती, मान आणि खांदे दुखीची समस्या दूर होते.

या आसनामुळे तणाव आणि थकवा दूर होतो.

धनुरासन केल्याने थायरॉइडची समस्याही दूर होते.

हे आसन करताना सर्वात जास्त पाठीच्या कण्यावर ताण येतो. त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो.

जर तुम्हाला कमी किंवा उच्च रक्तदाब तसेच हर्निया, कंबरदुखी, डोकंदुखी, मायग्रेन यांसारखे आजार असतील तर हे आसन करू नका. तसेच गरोदर महिलांनीही हे आसन करू नये.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

घसा सतत दुखतो का? एकदा हे घरगुती उपाय करून पाहा

...म्हणून मच्छर तुम्हाला चावतात, जाणून घ्या त्या मागचं कारण

या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर केस गळती कधीच थांबणार नाही!

या दोन चुकांमुळे तुम्ही कधीही होणार नाही जाड, पहिली चूक तर गंभीर

SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 08:55 AM IST

ताज्या बातम्या