मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डायबेटिस, पांढरे केस, पचनाच्या समस्यांवर कढीपत्ता आहे रामबाण उपाय

डायबेटिस, पांढरे केस, पचनाच्या समस्यांवर कढीपत्ता आहे रामबाण उपाय

कडिपत्ता

कडिपत्ता

कढीपत्त्याचा वापर पदार्थांचा स्वाद वाढवण्याबरोबर त्यांचं पोषणमूल्यही वाढवतो. कढीपत्ता केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवतो. डायबेटिस, अपचन यावर उपाय म्हणून तसंच वजन कमी करण्यासाठीही कढीपत्ता खाणं फायद्याचं ठरतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 डिसेंबर:    चटण्या, कोशिंबिरी, सांबार, भरीत अशा पदार्थांना स्वाद देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याची चुरचुरीत फोडणी अनेक पदार्थांची लज्जत वाढवते. मात्र, कढीपत्ता हा केवळ स्वादासाठी वापरला जात नाही तर त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात भूक अधिक लागते. अशावेळीही अन्न पचवण्यासाठी व आरोग्य सांभाळण्यासाठी कढीपत्ता मदत करतो. म्हणून स्वयंपाकात आवर्जून त्याचा वापर करावा.

कढीपत्त्याचा वापर पदार्थांचा स्वाद वाढवण्याबरोबर त्यांचं पोषणमूल्यही वाढवतो. कढीपत्ता केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवतो. डायबेटिस, अपचन यावर उपाय म्हणून तसंच वजन कमी करण्यासाठीही कढीपत्ता खाणं फायद्याचं ठरतं.

पांढऱ्या केसांवर उपाय

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक घटक कढीपत्त्यामध्ये असतात. तसंच कोंडा कमी करण्यासाठी, केसांचं आरोग्य सांभाळण्यासाठी, चिकट केसांना मोकळं करण्यासाठी, केसगळती कमी करण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळेच कढीपत्त्याचा वापर करून केसांसाठी तेल तयार केलं जातं.

हेही वाचा -  तुमच्या पायांचे बोट तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल काय सांगतात? वाचा सविस्तर

पचनक्रिया सुधारण्यासाठी

कढीपत्ता पचनक्रिया सुधारण्यासाठी व पोटदुखीवरील उपाय म्हणू महत्त्वाचा आहे. यामुळे आतड्याची हालचाल वाढते व पचनासाठी आवश्यक रस तयार करण्यासाठी मदत होते. डायरिया आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कढीपत्त्यासारखं चांगलं औषध नाही.

मॉर्निंग सिकनेसवर उपयुक्त

बरेचदा सकाळी उठल्यावर अस्वस्थ वाटतं, काही करण्याची इच्छा होत नाही. ताजंतवानं वाटत नाही. अशा तक्रारींवर कढीपत्त्याचा उपाय रामबाण आहे. गरोदर स्त्रियांना पहिल्या तीन महिन्यांत होणाऱ्या मळमळ व उलटीचा त्रास कमी करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो.

डायबेटिसवर गुणकारी

डायबेटिस असणाऱ्यांना कढीपत्त्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातल्या इन्शुलिनची कार्यक्षमता वाढवण्यात आणि पर्यायानं रक्तातली साखर कमी करण्यात कढीपत्त्याचा मोठा फायदा होतो.

हेही वाचा -  Lemon Peel: इतके उपयोगी गुण समजल्यावर तुम्ही कधीच फेकणार नाहीत लिंबाची साल

कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी

कढीपत्त्यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची निर्मिती कमी होते. त्यामुळे शरीरातलं वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं.

वजन कमी करण्यासाठी मदत

शरीराची पचनक्रिया चांगली असेल, तर सहसा अनेक आजार दूर पळतात. कढीपत्त्यामुळे पचन सुधारत असल्यानं वजन कमी करणाऱ्यांना त्याचा फायदा होतो.

कढीपत्त्यामध्ये कर्बोदकं, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, लोह आणि अनेक जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. याची मदत हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी होते. तसंच इन्फेक्शन कमी करण्यासही होते. कढीपत्त्यामध्ये अनेक जीवनसत्त्व व खनिजंही असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते, हृदयाचं आरोग्य सुधारतं, डायबेटिस नियंत्रणात राहतो. कढीपत्त्यातली पोषणमूल्य पाहता सर्वांनीच कढीपत्ता खाल्ला पाहिजे. त्यामुळे पदार्थांचा स्वाद व शरीराचं आरोग्य सुधारेल.

First published:

Tags: Lifestyle