...म्हणून हातात तांब्याची अंगठी घालणं असतं फायदेशीर

हिंदू धर्मात सोनं, चांदी आणि तांब या तीन धातूंना पवित्र मानण्यात आलं आहे. हा धातू स्वस्त जरी असला तरी त्याचे फायदे फार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 04:39 PM IST

...म्हणून हातात तांब्याची अंगठी घालणं असतं फायदेशीर

तुम्ही आतापर्यंत अनेकांच्या हातात तांब्याची अंगठी पाहिली असेल. प्राचीन काळापासून तांब्याची अंगठी किंवा दागिने हे घातले जात आहेत. एवढंच नाही तर हिंदू धर्मात सोनं, चांदी आणि तांब या तीन धातूंना पवित्र मानण्यात आलं आहे.

यामुळेच पूजेत आणि मंगल कार्यात तांब्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. हा धातू स्वस्त जरी असला तरी त्याचे फायदे फार आहेत. आज आपण तांब्याच्या अंगठीचे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

अतिसार आणि कावीळ यांसारख्या पोटांच्या आजारावर तांबं हे अत्यंत फायदेशीर आहे. तांब वापरल्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. त्यामुळे तांबं हे एक प्रकारे सुरक्षा कवच म्हणून काम करतं.

तांब्याची अंगठीचा थेट शरीराशी संपर्क येत असल्यामुळे त्यातील अनेक औषधी गुण आपसूक शरीराला मिळत असतात. तांब शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतं.

यासोबतच रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि त्वचा अधिक चमकदार होते. याशिवाय तांब्याची अंगठी घातल्याने शरीराची सूजही कमी होण्यास मदत होते.

Loading...

तांब्याची अंगठी शरीरातील गरमी कमी करण्यास मदत करते. ही हातात घातल्याने शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो. यासोबतच रागावर नियंत्रण ठेवणं सोप्पं होतं. ही अंगठी तन आणि मन दोघांनाही शांत ठेवायला फायदेशीर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 04:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...