जरूर खा, स्वादिष्ट आणि औषधी जांभूळ

जरूर खा, स्वादिष्ट आणि औषधी जांभूळ

उन्हाळ्यात आंब्याबरोबरच जांभळाचाही सीझन चालू होतो. उन्हाळ्यात उष्णतेनं त्रस्त होणाऱ्या सर्वांसाठीच ही फळं वरदान ठरतात.

  • Share this:

12 मे : स्वादिष्ट आणि औषधी असलेले जांभूळ हे फळ उन्हाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरते. कारण या फळामध्ये असे अनेक घटक आहेत, जे शरीरासाठी आवश्यक असतात. उन्हाळ्यात आंब्याबरोबरच जांभळाचाही सीझन चालू होतो. उन्हाळ्यात उष्णतेनं त्रस्त होणाऱ्या सर्वांसाठीच ही फळं वरदान ठरतात.

काय आहेत जांभळाचे फायदे ?

१. पोटातील उष्णता दूर होण्यास मदत

उन्हाळ्यात हमखास अनेकांच्या पोटात किंवा छातीत जळजळ होते. जांभूळ खाल्लाने पोटाला गारवा पोहचतो आणि जळजळीच्या समस्येपासून सुटका होते.

२. रोगप्रतिकारक क्षमता वाढते

उन्हाळ्यामध्ये अनेकजण आजारी पडतात. याचं कारण असतं प्रखर उष्णता. अशामध्ये जांभूळ आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते.

३. पचन व्यवस्थित होण्यास मदत

पोट आणि पचनसंबंधी समस्या सोडवण्यासाठीही जांभूळ फायदेशीर ठरतं.

४. मधुमेहापासून सुटका

मधुमेहाच्या त्रासाने अनेकजण हैराण असतात. जांभळाच्या वाळवलेल्या बिया वाटून खाल्यास हा त्रास कमी होऊ शकते.

५. हृदयासाठी फायदेशीर

संतुलित प्रमाणात असलेलं पोटॅशियम हृदयासाठी चांगलं असतं. आणि जांभळात असे पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं.

६. दात मजबूत होतात

याच्या बियांना वाटून त्याच्या पेस्टने दात घासल्यास दातांना मजबुती मिळते.

७. त्वचेसाठीही उपयुक्त

अनेकांची त्वचा सतत तेलकट होत असते. अशांनी जांभळाच्या बिया वाटून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास फायदा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 03:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading