मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रोज एक कप कॉफी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत भरपूर फायदे; योग्य वेळ जाणून घ्या

रोज एक कप कॉफी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत भरपूर फायदे; योग्य वेळ जाणून घ्या

ब्लॅक कॉफीमध्ये असलेलं कॅफिन चयापचय वाढवतं आणि शारीरिक कार्यक्षमताही वाढवतं. याशिवाय, यामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी3, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी5, व्हिटॅमिन बी2 असतं, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे (Benefits of black coffee) फायदेशीर आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिनव्यतिरिक्त अँटीऑक्सिडंट्स आढळतात. अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी याचा उपयोग होतो. कॉफी मेंदूला चांगलं कार्य करण्यास मदत करते आणि तुम्हाला ऊर्जा देते. हेल्थलाइनच्या मते, ब्लॅक कॉफीमध्ये असलेलं कॅफिन चयापचय वाढवतं आणि शारीरिक कार्यक्षमताही वाढवतं. याशिवाय, यामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी3, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी5, व्हिटॅमिन बी2 असतं, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे (Benefits of black coffee) फायदेशीर आहे.

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

1. नैराश्य दूर करते

ब्लॅक कॉफीच्या सेवनानं नैराश्य, चिंता, तणाव, जास्त झोप आणि आळस आदी कमी होतात आणि मेंदू सक्रिय राहतो. ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिन आढळतं, जे मेंदू आणि मज्जासंस्था या दोघांनाही उत्तेजित करू शकतं.

ब्लॅक कॉफीमध्ये आढळणारं कॅफिन चयापचय वाढवतं, जे खाल्ल्यानं ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सुधारते. शरीरात उष्णता निर्माण करून वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

3. अधिक सक्रिय होण्यास मदत होते

तुम्ही जिम किंवा व्यायामानंतर ब्लॅक कॉफीचं सेवन करत असाल तर, स्टॅमिना वाढवण्यासाठी ब्लॅक कॉफी खूप उपयुक्त आहे.

4. हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयोग

ब्लॅक कॉफी हृदयासाठीही चांगली असते. दररोज 1 किंवा 2 कप ब्लॅक कॉफी प्यायल्यानं स्ट्रोकसह कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा धोका कमी होतो. परंतु त्यात साखर आणि दूध घालू नये.

हे वाचा - सावधान! हिवाळ्यात ‘या’ व्यक्तींसाठी अधिकच वाढतो Heart Attack चा धोका; दैनंदिन जीवनात अशाप्रकारे करा बदल

5. याच्या मदतीनं मधुमेह ठेवा दूर

ब्लॅक कॉफी मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते. कारण, ब्लॅक कॉफी शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

हे वाचा - या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही कमी वयातच दिसता वृद्ध; आजच बदलायला हव्यात

ब्लॅक कॉफी कशी बनवायची

सर्वप्रथम, पाणी उकळवा आणि त्यात एक चमचा ब्लॅक कॉफी घाला. आता ती एका कपमध्ये ओतून प्या.

कॉफी पिण्याची योग्य वेळ

ब्लॅक कॉफीचं सेवन रिकाम्या पोटी करू नये. तुम्ही नाश्ता केल्यानंतर ही कॉफी पिऊ शकता.

First published:

Tags: Coffee, Health Tips