मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, पण इतकीही वाईट नसते सुपारी, हे हेल्थ बेनिफिट्स माहीत आहेत का

सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, पण इतकीही वाईट नसते सुपारी, हे हेल्थ बेनिफिट्स माहीत आहेत का

Benefits of Betel Nut : सुपारी दातांसाठी खूप फायदेशीर आहे. सुपारीमध्ये एन्थेलमिंटिक असते जे पोकळी काढून टाकून दात मजबूत करण्यास मदत करते. यासह, सुपारी पावडरचा वापर दातांचा पिवळापणा दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

  • Published by:  News18 Desk

 नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : सुपारी (Supari) म्हटलं की सर्वात आधी आपल्या मनात येणारी गोष्ट म्हणजे पान आणि गुटखा. हे खरं आहे, कारण पान-मसाल्यामध्ये सुपारीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. पण, अनेकांना माहीत नाही की, सुपारी आरोग्यासाठीही फायदेशीर (Benefits of Supari) आहे. तसंच सुपारीचा उपयोग पूजेमध्ये देखील केला जातो. आज आपण सुपारीच्या (Supari) असलेल्या अनेक फायद्यांबाबत माहिती घेऊया.

सुपारी फक्त पानासोबत खाल्ली जाते असे नाही, काहीजण हौसेखातर सुपारी तोंडात टाकून चघळतात. अनेकजण  माऊथ फ्रेशनर म्हणूनही त्याचा उपयोग करतात. सुपारीचा आरोग्यासाठी फायदा होतो, तसेच विविध प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी सुपारी उपयोगी ठरते.

दातांना फायदा होतो

सुपारी दातांसाठी खूप फायदेशीर आहे. सुपारीमध्ये एन्थेलमिंटिक असते जे पोकळी काढून टाकून दात मजबूत करण्यास मदत करते. यासह, सुपारी पावडरचा वापर दातांचा पिवळापणा दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

खाज सुटण्यापासून आराम

सुपारी त्वचेवर खाज सुटण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास खूप मदत करते. त्यासाठी तीळ तेलात बारीक करून पेस्ट बनवून सुपारी वापरता येते.

हे वाचा - सांगलीतील महिलेनं Amazon कंपनीला घातला 28 लाखांचा गंडा; 5 महिन्यांपासून करत होती फसवणूक

वेदनांपासून आराम देते

सुपारीच्या सेवनाने पाठदुखी आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. त्यात असलेले औषधी गुणधर्म तुमच्या स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. यामुळे स्नायूंच्या वेदना आणि कडकपणापासून त्वरीत आराम मिळतो.

बद्धकोष्ठता दूर करते

सुपारीच्या रोजच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होऊ लागते. असे मानले जाते की दररोज सुपारीचे एक ते दोन छोटे तुकडे खाल्ल्याने विषारी घटक शरीरातून बाहेर पडतात. यासोबतच सुपारी देखील पोटाशी संबंधित इतर अनेक समस्या दूर करून पचनसंस्था मजबूत करण्यात विशेष भूमिका बजावते.

हे वाचा - विमानातच स्वतःची वापरलेली अंतर्वस्त्र विकून करोडपती झाली एअर होस्टेस; रातोरात पालटलं नशीब

तोंडाच्या व्रणांपासून (अल्सर) आराम मिळतो

तोंडाचे आणि ओठांचे व्रण दूर करण्यासाठी तुम्ही सुपारीचीही मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सुपारी चघळूनही या समस्येवर मात करू शकता. तुम्हाला हवे असल्यास सुपारीसोबत कच्चे पान देखील खाऊ शकता.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips