बदाम खाण्याचे हे अनोखे फायदे आतापर्यंत तुम्हाला माहीत नसतील!

फार कमी लोकांना माहीत आहे की बदाम हे कडू आणि गोड अशा दोन प्रकारचे असतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 07:12 AM IST

बदाम खाण्याचे हे अनोखे फायदे आतापर्यंत तुम्हाला माहीत नसतील!

अवघ्या दोन महिन्यावर थंडी येऊन ठेपली आहे. थंडीत पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. त्यातही थंडीत आरोग्य चांगलं राखण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. तसं पाहीलं गेलं तर वर्षाच्या 12 ही महिने दररोज किमान दोन बदाम खाणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. बदामानं शरीर आणि मन निरोगी राहतं. म्हणूनच बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हटलं जातं. फार कमी लोकांना माहीत आहे की बदाम हे कडू आणि गोड अशा दोन प्रकारचे असतात. त्यातले गोड बदाम हे खाल्ले जातात. बदामात लोह, तांबे, फॉस्फरस आणि अनेक जीवनसत्त्व असतात. याशिवायही बदामाचे अनेक फायदे आहेत.

-बदाम खाल्ल्यानं उत्साह वाढतो. मेंदू, मज्जातंतू, हाडं, हृदय आणि यकृत यांचं कार्य सुरळीत चालतं. हाडं मजबूत होतात.

-बदाम खाल्ल्यानं अशक्तपणा कमी होतो.

-जुनाट मलावरोधावर बदाम सारक आहे. झोपताना 14- 15 बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होतं.

-बदामाचं दूध सर्वात पौष्टिक मानलं जातं. ते पचायलाही हलकं असतं.

Loading...

-बदाम सौंदर्यवर्धक आहे. बदामाची पेस्ट, दुधाची साय आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून चेहऱ्याला लावल्या तर चेहरा तेजस्वी आणि त्वचा मुलायम होते.

-बदामाचं तेल आणि एक चमचा आवळ्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्यास केस गळणं कमी होतं. केसात कोंडा झाला असेल तर हे तेल उपयोगी पडतं.

-बदामाची पूड पाण्यात घालून घेतली तर कफापासून आराम मिळतो. घसा खवखवत असेल तर बदामाची पूड फायदेशीर.

- बदाम पाण्यात भिजत घालूनच खावेत. शक्यतो सकाळी बदाम खाल्ले तर आरोग्याला गुणकारी असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 07:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...