कंबरदुखी आणि डोकेदुखीवर 'हा' आहे रामबाण उपाय

कंबरदुखी आणि डोकेदुखीवर 'हा' आहे रामबाण उपाय

अ‍ॅक्युप्रेशरचा कंबरदुखी, डोकेदुखीवर कसा परिणाम होतो? अ‍ॅक्युप्रेशरचा वापर कसा कराल.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल: कंबरदुखी आणि डोकेदुखीचा त्रास महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा आहे. या  त्रासावर उपाय म्हणून महिला तात्पुरतं पॅरॅसिटमॉल घेतात. काहीवेळा सरळ महिला याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येकवेळी इतक्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे जाणं टाळतात. आम्ही तुम्हाला यावर एक रामबाण उपाय सांगणार आहोत.

अ‍ॅक्युप्रेशरने तुम्ही अगदी सहज तुमचं दुखणं कमी करू शकता. अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला आराम मिळू शकतो. कही वेळा आपल्याला अचानक कंबर आणि डोकेदुखीची समस्या जाणवते. प्रत्येकवेळी आपल्याजवळ मेडिकल किंवा गोळी उपलब्ध असतेच असं नाही. अशा वेळी तुम्ही या टेकनिकचा वापर केला तर तात्काळ आराम मिळू शकतो.

हंगाम बदलतो त्यानुसार आजारही बदलत जातात सर्दी, खोकला आणि ताप हे आजर आपल्याला जाणवतात. सर्दी किंवा हवामानातील बदलामुळे डोकं जड होतं यासाठी दोन्ही अंगठ्यापासून पायाच्या दिशेनं पॉईंट दाबायला सुरुवात करा. 10 मिनिटं सातत्यानं दाबल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

बऱ्याच वेळा आपल्याला ताण येतो. ऑफिस किंवा कॉलेमधील टेन्शनमुळे आपण अस्वस्थ असतो. अशावेळी दोन्ही पायांची बोटं दाबावीत त्यामुळे तणाव येणारे हार्मोन्स नॉर्मल होण्यास मदत होते.

साधारण डोकं दुखत असेल तर तुमच्या दोन्ही हाताच्या बोटांवरील भागाला मालिश करावी यामुळे डोकेदुखी थांबते. हे फक्त साधारण डोकेदुखीसाठी लागू होतं तुम्हाला कोणता त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

महिलांना पाळीच्या वेळी डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास होत असतो. त्यावर उपाय म्हणून तुम्ही दोन्ही हातांची बोटं आणि तळवे हळूहळू दाबून मालिश करा. असं 10 मिनिटं केल्यानं तुम्हाला आराम मिळतो.

VIDEO: उदयनराजेंच्या डायलॉगबाजीवर आदित्य ठाकरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 07:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading