मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weightlifting मुळे महिलांची Body पुरुषांसारखी होते का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

Weightlifting मुळे महिलांची Body पुरुषांसारखी होते का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

महिलांनी (Women) वेट ट्रेनिंग दररोज करू नये, यामुळे त्या पुरुषी दिसतात असं म्हटलं जातं (Weight lifting).

महिलांनी (Women) वेट ट्रेनिंग दररोज करू नये, यामुळे त्या पुरुषी दिसतात असं म्हटलं जातं (Weight lifting).

महिलांनी (Women) वेट ट्रेनिंग दररोज करू नये, यामुळे त्या पुरुषी दिसतात असं म्हटलं जातं (Weight lifting).

    मुंबई, 28 नोव्हेंबर : आजकाल फिटनेसबाबत (fitness) जागरूकता वाढली आहे. लहान वयात होणारे गंभीर आजार, ताणतणावाचं आयुष्य, धावपळ, प्रदूषण या सगळ्याचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर अंतर्बाह्य तंदुरुस्त राखण्यासाठी व्यायाम, योगासनं, प्राणायाम याद्वारे प्रयत्न केले जातात. महिलाही आपला शरीरबांधा कमनीय ठेवण्यासाठी व्यायाम करण्यावर भर देत असतात (Weight lifting benefits and side effect). यासाठी आजकाल प्रशिक्षित व्यायामतज्ज्ञ असतात. ते विविध व्यायाम प्रकारांचं प्रशिक्षण देत असतात. या व्यायाम प्रकारांत कार्डिओ (cardio), वेट ट्रेनिंग (Weight Training) अशा अनेक व्यायाम प्रकारांचा समावेश असतो; मात्र अनेकदा महिलांनी कुठले व्यायाम प्रकार करावेत, कुठले करू नयेत यांबाबत अनेक गैरसमज असल्याचं आढळतं. विशेषतः महिलांनी (Women) वेट ट्रेनिंग दररोज करू नये, यामुळे त्या पुरुषी दिसतात असं म्हटलं जातं (Weight lifting). पण खरंच असं आहे का?  याबाबत FITTRच्या प्रशिक्षित ट्रेनर अक्षिता अरोरा (Akshita Arora) यांनी 'हेल्थशॉट्स'ला माहिती दिली (Woman Weight lifting).

    हृदयाच्या आरोग्यासाठी जे व्यायाम असतात त्यांना कार्डिओ (cardio) म्हटलं जातं, तर स्नायू बळकट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या व्यायामांना वेट ट्रेनिंग (Weight Training) असं म्हटलं जातं. महिलांनाही वेट ट्रेनिंग दिलं जातं. यामध्ये डंबेल्स, रेझिस्टन्स बँड, वेटलिफ्टिंग, तसंच बॉडीवेटचे अनेक व्यायाम असतात. या वेट ट्रेनिंगचे महिलांना अनेक फायदे होतात. यामुळे हात, पाय, खांद्याचे स्नायू बळकट होतात.  महिलांची कार्यक्षमता, चपळता, ताकद वाढते. क्रीडापटू असल्यास त्यांना याचा चांगला फायदा होतो. व्यायाम करतानाच कॅलरी जळतात असं नाही, तर शरीर विश्रांतीच्या स्थितीत असतानादेखील ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे दिवसभर कॅलरी जळतात. त्याचप्रमाणे या व्यायामामुळे शरीरात एंडोमॉर्फिन (Endomorphin) हॉर्मोनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मूडही सुधारतो.

    हे वाचा -दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

    'स्ट्रेंग्थ ट्रेनिंग अँड दी रिस्क ऑफ टाइप 2 डायबेटिस अँड कार्डिओव्हस्कुलर डिसीज' या संशोधनानुसार, ज्या महिलांनी दररोज वेट ट्रेनिंग केलं आहे, त्यांच्यामध्ये टाइप 2 मधुमेहाच्या (Diabetes) शक्यतेत 30 टक्के घट झाली, तर मधुमेहाचा धोकाही कमी झाला. हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार होण्याचं प्रमाणही 17 टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळलं आहे. स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याचं प्रमाणही यामुळे कमी होत असल्याचं आढळलं आहे. वेट ट्रेनिंगमुळे हाडांची (Bone Density) घनता सुधारल्याचं दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे बर्‍याच स्त्रियांमध्ये लीन टिश्यू पातळ (lean Tissue) असतात; पण वेट ट्रेनिंगमुळे या महिलांचे स्नायू अधिक टोन्ड होतात, तसंच त्यांच्या एकूण कार्यक्षमतेतही वाढ होते. जीवनशैलीमुळे (Lifestyle Diseases) होणारे आजारही दूर राहण्यास मदत होते.

    त्याच वेळी, वेट ट्रेनिंगमुळे स्त्रिया पुरुषी (Manly), बळकट दिसतात, तसंच त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो असे गैरसमज आहेत. हे अत्यंत चुकीचे समज असून, असं काहीही होत नसल्याचं अरोरा यांनी स्पष्ट केलं. दररोज वेट ट्रेनिंग केल्यामुळे शरीरावर कोणतेही प्रतिकूल परिणाम होत नाहीत; मात्र प्रत्येकाने योग्य मार्गदर्शनाखाली आणि आपल्या शरीराला योग्य असतील असेच व्यायाम करणं आवश्यक आहे. दररोज स्ट्रेंग्थ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणून ओळखले जाणारे फ्री वेट, रेझिस्टन्स बँड, वेटलिफ्टिंग, तसंच बॉडीवेट व्यायाम केल्यामुळे फिटनेसचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होतं आणि त्यांची शरीरयष्टीही आकर्षक होण्यास मदत होते, असं अरोरा यांनी नमूद केलं.

    हे वाचा - स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

    व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्म-अप करणं आवश्यक असून, उत्तम आरोग्यासाठी रात्रीची चांगली झोप घेणं आवश्यक आहे, असंही अरोरा यांनी आवर्जून नमूद केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Fitness, Lifestyle, Woman