मुंबई 24 सप्टेंबर : उत्तम आरोग्यासाठी रोज फळं खावीत, असा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देत असतात. सध्याच्या काळात आहारात बदल झाल्यामुळे अनेकांचा जास्त कल बाहेरचे पदार्थ, जंकफूड, प्रक्रियायुक्त पदार्थ खाण्याकडे आहे. मात्र असे पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त नसतात. या पदार्थांमुळे लठ्ठपणा, डायबेटीससारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या पदार्थांऐवजी सुका मेवा, फळं, हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश असावा, असं तज्ज्ञ सांगतात. फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. केळी अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध होतात. रोज एक केळी खाल्ल्यास शरीराला पोषक तत्त्वं मिळतात.
केळ्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. कच्ची, पिकलेली, लहान आकाराची असे केळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. दिवसभरात कोणत्या वेळी आणि कोणत्या प्रकारची केळी खावीत हे जाणून घेणंदेखील महत्त्वाचं आहे. `वेबदुनिया डॉट कॉम`ने याविषयी माहिती दिली आहे.
सावधान! पनीर पौष्टिक; पण काही जणांसाठी ठरू शकतं हानिकारक...
रोज किमान एक तरी केळी खावी, असा सल्ला घरातली मोठी माणसं देताना तुम्ही नक्कीच ऐकला असेल. केळी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केळ्यांच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते, ताकद वाढते, शुक्राणूंची संख्या वाढते. मात्र केळी खाण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे.
काहीजण रात्री झोपण्यापूर्वी केळी खातात. पण हे अयोग्य आहे. कारण रात्री केळ्यांचं सेवन केलं तर आजारी पडण्याची शक्यता असते. यामुळे खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे पोट रिकामं असताना केळी खाऊ नयेत. कारण यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल, पण ती दीर्घ काळ टिकणार नाही. तुम्हाला लवकर थकवा आणि सुस्ती जाणवेल.
रोज दोन केळी खाणं आरोग्यासाठी उत्तम आहे. यामुळे शरीराला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतात. सकाळी दोन केळी खाऊन त्यावर कोमट दूध प्यायल्यास आरोग्य चांगलं राहतं. रोज एक केळ खाल्ल्यास मेंदूची क्षमता वाढते. तसंच महिलांमधली ल्युकेरियाची समस्या दूर होते. जेवणानंतर दोन केळी खाल्ल्यास अन्नपचन चांगलं होतं. शरीरातली ताकद वाढते आणि पचनशक्ती सुधारते.
भात खाल्ल्यानं वजन वाढत नाही; पाहा संशोधनातून काय समोर आलं
पिकलेली केळी सालासह भाजून त्यांची साल काढून टाकावी. त्यानंतर त्यांचे बारीक तुकडे करून त्यावर काळी मिरी टाकावी आणि असं गरम केळ दमा असलेल्या रुग्णाला खायला द्यावं. यामुळे दमा असलेल्या रुग्णाचा त्रास कमी होईल. डाग असलेली, तसंच साल पातळ असलेली केळी आरोग्यासाठी चांगली असतात.
एक ग्लास दुधात एक चमचा तूप, एक चिमूट वेलची पावडर एकत्र करावी आणि केळीच्या तुकड्यांसोबत हे दूध प्यावं. याप्रकारे रोज दोन केळी खाल्ल्यास शरीर सुडौल होतं. तसंच वजनदेखील वाढतं. एका पिकलेल्या केळ्यात काळ्या मिरीचे आठ दाणे भरावेत. त्यानंतर साल पुन्हा लावून केळं उघड्यावर ठेवावं. सकाळी शौचाला जाण्यापूर्वी केळ्यातली काळी मिरी खावी आणि त्यावर केळं खावं. हा उपाय काही दिवस केल्यास सर्व प्रकारचा खोकला बरा होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fruit, Health Tips