Home /News /lifestyle /

प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं पोट कसं कमी करायचं; तुमच्यासाठी सोपे घरगुती उपाय

प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं पोट कसं कमी करायचं; तुमच्यासाठी सोपे घरगुती उपाय

बाळाची काळजी घेताना महिलांना आपलं वजन, पोट कमी करण्यासाठी वेगळा पुरेसा वेळ देता येत नाही. मात्र कोणतीही मेहनत न घेता सोप्या उपायांनी वजन, पोट कमी करू शकता.

  • myupchar
  • Last Updated :
    आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण. बाळ झाल्यानंतर तिला इतका आनंद होतो, की ती शब्दात मांडू शकत नाही. मात्र सोबत तिला आपल्यामध्ये झालेल्या शारीरिक बदलांबाबतही चिंता वाटू लागते. वाढलेलं वजन, वाढलेलं पोट कमी करण्यासाठी तिची धडपड सुरू होते. बाळाची काळजी घेताना महिलांना आपलं वजन, पोट कमी करण्यासाठी वेगळा पुरेसा वेळ देता येत नाही. मात्र काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला जिमला जात येत नसलं, तरी घरच्या घरी तुम्ही सोप्या उपायांनी वजन आणि पोट कमी करू शकता. हे घरगुती उपाय कोणते पाहुयात. निरोगी आहार स्त्रियांनी आपल्या आहारात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वं, प्रथिनंयुक्त पदार्थांचं सेवन करावं. जास्त कर्बोदकयुक्त आहार घेऊ नये. पुरेशा प्रमाणात पाणी प्या प्रसूतीनंतर डॉक्टर थोडं कमी पाणी पिण्याचा सल्ला देतात कारण त्यावेळी जास्त पाणी प्यायल्यामुळे पोट अधिक फुगू शकते. पण विशिष्ट वेळेनंतर भरपूर पाणी प्या. जास्तीचे पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी तसंच इतर विषारी पदार्थ काढून टाकतं. स्तनपान myupchar.com शी संबंधित डॉ विशाल मकवाना यांनी सांगितलं, आई झाल्यानंतर बाळाला स्तनपान देण्यानं शरीरातील कर्बोदकांचं प्रमाण कमी होतं. व्यायाम myupchar.com शी संबंधित डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, प्रसूतीनंतर लठ्ठपणा कमी करण्यासाठी चाला. गर्भवती स्त्रियांचे पोट बाळ जन्मल्यानंतर फुगतं कारण पोटाच्या स्नायूदेखील ताणले जातात. यासाठी काही सोपे व्यायाम करणं आवश्यक आहे जेणेकरून स्नायू पूर्वस्थितीत येतील. यात पेल्विक टिल्ट, पेल्विक ब्रिज, हील स्लाइड, टॉवल पल्स आणि लेग स्ट्रेट यासारखे व्यायाम तुम्ही करू शकता. मेथीची दाणे मेथीच्या दाण्यांनी पोटाची चरबी कमी होऊ शकते. एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी 10 मिनिटं पाण्यात उकळवा. हे पाणी 40 दिवस प्या. जर पाणी कडू वाटत असेल तर आपण त्यात थोडंसं लिंबू आणि मध टाकू शकता. जव आणि ओव्याचे पाणी जव आणि ओव्याचे पाणी पोटाची चरबी कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. एक चमचा जव आणि एक चमचा ओवा घातलेलं पाणी 5 ते 10 मिनिटं उकळवा. प्रसूतीनंतर 1 महिना साध्या पाण्याऐवजी हे पाणी प्या. दालचिनी आणि लवंगाचे पाणी एक चमचा दालचिनी आणि दोन ते तीन लवंगा 5-10 मिनिटं 2 लीटर पाण्यात उकळवा. प्रसूतीनंतर महिनाभर साध्या पाण्याऐवजी हे पाणी प्या. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख गर्भधारणा कशी करावी न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health, Pregnancy, Pregnant woman, Weight loss

    पुढील बातम्या