मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Beetroot-Carrot Juice Benefits: हिवाळ्यात दररोज गाजर-बीटाचा रस पिणं आहे फायदेशीर; आरोग्याला मिळतात इतके फायदे

Beetroot-Carrot Juice Benefits: हिवाळ्यात दररोज गाजर-बीटाचा रस पिणं आहे फायदेशीर; आरोग्याला मिळतात इतके फायदे

Beetroot-Carrot Juice Benefits: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक प्रकारचे आजार होतात. अशा स्थितीत आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही बीट-गाजरचा रस आहारात समाविष्ट करू शकता. या दोन्ही भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

Beetroot-Carrot Juice Benefits: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक प्रकारचे आजार होतात. अशा स्थितीत आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही बीट-गाजरचा रस आहारात समाविष्ट करू शकता. या दोन्ही भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

Beetroot-Carrot Juice Benefits: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक प्रकारचे आजार होतात. अशा स्थितीत आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही बीट-गाजरचा रस आहारात समाविष्ट करू शकता. या दोन्ही भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात.

नवी दिल्ली, 02 डिसेंबर : हिवाळ्यात यंदा खूपच वातावरणीय बदल होताना दिसत आहेत, थंडी पडते त्यानंतर मध्येच पाऊस पडतो, त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. या काळात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक प्रकारचे आजार होतात. अशा स्थितीत आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही बीट-गाजरचा रस आहारात समाविष्ट करू शकता. या दोन्ही भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होतेच आणि आरोग्यासही एक नाही तर अनेक फायदे (Beetroot-Carrot Juice Benefits) मिळतात.

बीटमध्ये पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम, आयोडीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सल्फर, कॉपर, फॅट आणि व्हिटॅमिन बी1, बी2, बी6 आणि नियासिन यांसारखे पोषक घटक आढळतात. तर गाजरमध्ये मल्टीविटामिन्स, बीटा कॅरोटीन, फायबर, व्हिटॅमिन-के1, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे गुणधर्म आढळतात. जाणून घेऊया बीट आणि गाजरचा रस पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत.

बीट-गाजराचा रस पिण्याचे फायदे

वजन कमी करण्यास उपयुक्त

बीट-गाजरचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. तसेच यातील फायबरमुळे ते प्यायल्यानंतर लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा खावेसे वाटत नाही.

रक्ताची कमतरता पूर्ण

गाजर-बीटाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. हा रस रक्तातील हिमोग्लोबिनची उच्च पातळी राखण्यास मदत करतो.

प्रतिकारशक्ती मजबूत होते

बीट-गाजरचा रस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. हा रस प्यायल्याने हंगामी आजारांचा धोका खूप कमी होतो. उर्जा पातळी वाढवण्यातही रस खूप मदत करतो.

हे वाचा - Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित

पचनसंस्था सुधारते

बीट-गाजरचा रस पचनसंस्था सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर फायबर असतात ज्यामुळे योग्य पचन राखण्यात खूप मदत मिळते.

हे वाचा - औषधांच्या पाकिटांवर का असते अशी लाल पट्टी? एक्सपायरी डेट इतकीच ती समजून घेणं आहे गरजेचं

त्वचा चमकदार बनते

बीट-गाजरचा रस त्वचेला चमकदार बनवण्यातही खूप मदत करतो. हा रस प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि मृत पेशींचा वरचा थर काढून त्वचा गुळगुळीत आणि कोमल बनते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips, Winter